शासन निर्णयाची अवहेलना

By admin | Published: May 11, 2017 12:27 AM2017-05-11T00:27:21+5:302017-05-11T00:27:21+5:30

तिरोडा तालुक्याच्या गांगला ग्रा.पं.मध्ये सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्राम उदय ते भारत उदय या शासनाच्या महत्वपूर्ण

Disregard the governance decision | शासन निर्णयाची अवहेलना

शासन निर्णयाची अवहेलना

Next

गांगला ग्रामपंचायतमधील प्रकार : ग्राम उदय ते भारत उदय अभियानाचा फज्जा
लोकमत न्यूज नेटवर्क
काचेवानी : तिरोडा तालुक्याच्या गांगला ग्रा.पं.मध्ये सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्राम उदय ते भारत उदय या शासनाच्या महत्वपूर्ण घोषित निर्णयाची अवहेलना करण्यात आली. ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार जि.प.च्या पत्रानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता त्यात सदर कार्यक्रम घेण्यात आले नसल्याची बाब उघडकीस आली.
भारत सरकार व राज्य शासनाने खास उपक्रम म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती भारतभर सर्व स्तरावर शासनाच्या परिपत्रकानुसार १४ एप्रिल ते २४ एप्रिल २०१६ या दरम्यान साजरी करावयाची होती. या कार्यक्रमाकरिता पाच हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले होते.
शासनाच्या परिपत्रकाची व आदेशाची अवहेलना करून ग्रा.पं. गांगला येथे जयंतीनिमित्त साधे छायाचित्रही न लावता एक फूलसुध्दा अर्पण करण्यात आला नाही. याची तक्रार ११ मे २०१६, १३ जुलै २०१६ व १५ नोव्हेंबर २०१६ ला करण्यात आली होती. ३० नागरिकांच्या स्वाक्षरीनिशी तक्रार व निवेदन देवून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.
उमुकाअ जि.प. गोंदिया यांच्या पत्रानुसार (साप्रवि/पंचा/कस/का-२८/कावि-४१५/२०१६ दि. १७/११/२०१६) चौकशी करून अहवाल सादर करण्याचे तिरोडा गटविकास अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले होते. चौकशीत ग्रामसभेचे नियोजन न होणे व ग्राम उदय ते भारत उदय कार्यक्रमाची चौकशी करण्यात आली. यात काही बाबी उघड झाल्या आहेत. चौकशी विस्तार अधिकारी धारगावे यांनी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त ग्राम उदय ते भारत उदय या अभियानांतर्गत ग्रा.पं. गांगला येथे ग्रामसभेचे नियोजन व आदरांजली कार्यक्रम घेण्यात आले नाही. १४ ते २४ एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रम घ्यायचे होते. मात्र एकही कार्यक्रम न घेतल्याने सरपंच व ग्रामसेवकाने शासनाचे घोषित निर्णय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
२५ मे २०१६ ची ग्रामसभा ३१ मे रोजी तहकुब सभा घेण्यात आली. ती कायदा व नियमानुसार झाली नसल्याची तक्रार हगरु तुलाराम नंदेश्वर व सुखराम गणवीर यांनी केली होती. ग्रामसेवकांना नोव्हेंबर २०१५ व मे २०१६ ची ग्रामसभेचे प्रोसिडींग व हजेरी बुकची सत्यप्रत मागितली. परंतु देण्यात आली नाही, असे चौकशीत आढळले.
सरपंच सविता चामट यांचे लेखी बयान नोंदविण्यात आले. सविता यांनी सांगितले की, ग्राम उदय ते भारत उदय या अभियानासंबंधी झालेल्या पं.स.च्या सभेची माहिती आपल्याला नव्हती. तत्कालीन ग्रामसेवक धुर्वे यांनी सांगितले, परंतु आपण गावात नसल्याने कार्यक्रमाविषयी माहिती नसल्याचे बयानात सांगितले.
ग्रामसेवक पी.एम. चव्हाण यांनी लेखी बयान नोंदविले. ग्राम उदय ते भारत उदयकरिता पाच हजार रूपये प्राप्त झाले. कार्यक्रम झाले असल्याची कोणतीही माहिती प्राप्त झाली नाही. त्यामुळे कार्यक्रमाकरिता निधी खर्च झाल्याची नोंद रोखरहीत नाही.
ग्रामसेवक चव्हाण आणि सरपंच सविता चामट यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा हगरु नंदेश्वर, सुखराम गणवीर, जयभीम सांगोडे, के.आर. टेंभेकर सहीत शेकडो ग्रामस्थांनी दिला आहे.

चौकशी समितीचा निष्कर्ष
महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय (११७/परा-३ दि. ६ एप्रिल २०१६) प्रमाणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त ग्राम उदय ते भारत उदय या अभियानांतर्गत ग्रामसभेचे नियोजन व आदरांजली कार्यक्रम १४ ते २४ एप्रिल २०१६ दरम्यान विविध कार्यक्रम घ्यायचे होते. यासाठी पाच हजार रुपयांची तरतूद होती. परंतु सदर कार्यक्रमाबद्दल ग्रा.पं. गांगला येथे कार्यक्रम झाल्याची कोणतीही नस्ती ठेवलेली नसून निधी खर्च झाल्याची नोंद रोखवहीत नाही.
गटविकास अधिकाऱ्यांचा अभिप्राय
सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतला शासन निर्णयानुसार ग्राम उदय ते भारत उदय या अभियानांतर्गत १४ ते २४ एप्रिलदरम्यान विविध कार्यक्रम घ्यायचे होते. परंतु ग्रा.पं. गांगला येथे शासन निर्देशान्वये ग्रामसभेचे नियोजन व आदरांजली कार्यक्रम घेण्यात आले नाही. ग्रामसभा महा. ग्रा.पं.अधिनियम १९५८ चे कलम ७ अन्वये अंमलबजावणी करताना सरपंच व ग्रामसेवक यांना अपयश आल्याचे दिसून येते.

सरपंचाला हार घालण्यास मज्जाव
१४ एप्रिल २०१७ ला मागील वर्षी केलेल्या अवमाननेच्या रागापोटी यावर्षी सरपंचांस कोणतेही निमंत्रण देण्यात आले नसताना अचानक सरपंच सविता चामट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करायला आल्या. त्यावेळी सर्व बौध्द बांधवानी त्यांना हार घालण्यास मनाई केली. सन २०१६ मध्ये अपमान व अवहेलना केले असताना माफी न मागितल्याचे कारण सांगितले आहे.
 

Web Title: Disregard the governance decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.