वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 09:47 PM2017-08-13T21:47:19+5:302017-08-13T21:47:59+5:30
येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात शिरून कर्मचाºयांना म्हसगाव येथील सरपंचांसह २०-२५ जणांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री ८.३० वाजता दरम्यान घडली.
कर्मचाºयांना मारहाण : म्हसगाववासीयांनी घातला गोंधळ
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात शिरून कर्मचाºयांना म्हसगाव येथील सरपंचांसह २०-२५ जणांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री ८.३० वाजता दरम्यान घडली. प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.
वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रावरुन ६५ गावांना वीज पुरवठा करण्यात येतो. यामुळे अनेक वेळा तांत्रिक अडचणीमुळे वीज पुरवठा खंडित होतो. यामध्ये गोरेगाव, मुंडीपार, कटंगी, मिलटोला चार फिडर असून मुंडीपार फिडरमध्ये सर्वाधिक २५ गावांचा समावेश आहे. या फिडरमध्ये बिघाड आल्याने शनिवारी (दि.१२) रात्री ८.३० वाजता वीज पुरवठा खंडीत झाल्याची माहिती मिळताच अभियंता डी.सी. बिसेन यांनी कर्मचाºयांना फिल्डवर पाठवून फॉल्ट काढून लाईन दुरुस्ती करण्यास सांगितले.
लाईन दुरुस्तीचे काम उपकेंद्रात सुरु असतानाच म्हसगाव येथील सरपंच एकराम बुरडे, बाबा रहांगडाले यांच्यासह २० ते २५ लोकांनी उपकेंद्रात येऊन कार्यालयात काम करणाºया कर्मचाºयांसोबत बाचाबाची व मारहाण करून सामानाची तोडफोड केली.
तसेच म्हसगावचा पुरवठा बंद असल्यामुळे गोरेगावचाही पुरवठा बंद करण्याची धमकी देवून ग्रीप काढून फेकल्या व गोेरेगावचा चालू पुरवठा खंडीत केला.
यावेळी लाइनमेन के.टी. लांजेवार, एफ. टी. कुरेशी, जी.एम. चव्हाण, एस.एस. निपाने व इतर कर्मचारी आपापले काम करीत असतानाच लांजेवार यांना खांबावरुन उतरवून गोरेगावची लाईन आधी बंद करा म्हणून ढकल ढूकल करुन मारहाण करण्यात आली. या प्रकरणामुळे कर्मचाºयांत दहशतीचे वातावरण असून असे प्रकार घडू नये यासाठी कर्मचाºयांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी, अशी मागणी कर्मचाºयांनी केली आहे.
सरपंचांसह ३० जणांवर गुन्हा दाखल
शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेत वरिष्ठ तंत्रज्ञ रविंद्र ठमठेरे यांच्या तक्रारीवरून म्हसगावचे सरपंच बुरडे (४२), मुन्ना कावडे (३८), बाबा रहांगडाले (४३), प्रवीण रहांगडाले (३०), देवेंद्र रहांगडाले (४३) व इतर २५ अशा एकूण ३० जणांवर गोरेगाव पोलिसांत भादंवीच्या कलम ३५३, ५०४,५०६,१४३,१४७,१४९, १८६ अंतर्गत गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.