जिल्ह्यात रोवण्या खोळंबल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 12:49 AM2017-08-05T00:49:30+5:302017-08-05T00:50:06+5:30
गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील ९२ हजार हेक्टरमधील रोवण्या खोळंबल्या आहे.
देवानंद शहारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील ९२ हजार हेक्टरमधील रोवण्या खोळंबल्या आहे. येत्या तीन चार दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यात धान पिकाच्या लागवडीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ७८ हजार २२९ हेक्टर आहे. त्यापैकी आतापर्यंत रोवणी व आवत्या मिळून केवळ ८५ हजार ५९७ हेक्टरमध्ये (४८ टक्के) रोवणीची कामे पूर्ण झाली आहेत. तब्बल ९२ हजार ६३४ हेक्टर रोवणीची कामे पावसाअभावी खोळंबली आहेत.
हवामान विभागाने यंदा सुरूवातीपासून चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यावरच विश्वास ठेऊन शेतकºयांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण मे महिन्यात आटोपली. मात्र, यंदा सुरूवातीपासूनच पावसाने हुलकावणी दिली. हवामान विभागाचे सर्व अंदाज फोल ठरल्याने शेतकºयांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात रोपवाटिकेचे सर्वसाधारण क्षेत्र १८ हजार ८१६ हेक्टर असताना प्रत्यक्ष पेरणी १८ हजार ०७६ हेक्टरमध्ये शेतकºयांनी केली आहे. याची टक्केवारी ९६ असून अनेक शेतकºयांनी त्या रोपांची रोवणी अद्यापही अनेक केली नाही. त्यांची रोवणी न झाल्याने शेतातील पºहे तसेच आहेत. शिवाय पºहे अधिक दिवसांची झाल्याने ती रोवणी योग्य राहिलेली नाही. परिणामी शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसण्याचे चिन्ह आहे.
कृषी विभागाच्या पीक पेरणी अहवालानुसार, जिल्ह्यात रोवणीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ७८ हजार २२९ हेक्टर आहे. मात्र रोवणी केवळ ७६ हजार ०६६ हेक्टर क्षेत्रात (४३ टक्के) व आवत्या नऊ हजार ५३१ हेक्टरमध्ये झाल्या आहेत. पाऊस आज येईल उद्या येईल या आशेवर शेतकरी आकाशाकडे डोळे लावून आहेत. पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळाची चिन्हे दिसून येत आहेत. त्यामुळे शासनाने कृषी विभागाकडून रोवणीपासून वंचित असलेले क्षेत्र व ज्यांची रोवणी आटोपली मात्र पाण्याअभावी रोवलेले पºहे वाळत आहेत अशा शेताचे तातडीने सर्वेक्षण करण्याची मागणी जोर धरत आहे.
शासनाने मागविला अहवाल
पावसाअभावी विदर्भातील अनेक भागात दुष्काळी परिस्थितीचे चित्र आहे. जिल्ह्यातील किती हेक्टरमधील रोवणी खोळंबली आहेत व किती हेक्टरमधील पºहे वाळली याची माहिती शासनाने कृषी विभागाकडून मागविली आहे.
ज्या शेतकºयांची रोवणी रखडली आहेत किंवा रोवणी आटोपून पावसाअभावी पºहे वाळत आहेत. पाण्याअभावी ज्यांनी पेरणी केली नाही अशा सर्व शेतकºयांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गोंदिया