जिल्ह्यात सर्वाधिक ५१०० मेट्रिक टन धान्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 05:00 AM2020-04-08T05:00:00+5:302020-04-08T05:00:23+5:30

गोंदिया जिल्ह्यात अन्नधान्याची टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ अन्वये कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही पात्र शिधापत्रिकाधारकांची लाभार्थ्यांची संख्या २ लाख १८ हजार ५४४ कार्ड संख्या व त्यावरील लोकसंख्या १० लाख २१ हजार ५८१ इतकी आहे.

Distribution of 5100 metric tonnes of paddy in the district | जिल्ह्यात सर्वाधिक ५१०० मेट्रिक टन धान्याचे वाटप

जिल्ह्यात सर्वाधिक ५१०० मेट्रिक टन धान्याचे वाटप

googlenewsNext
ठळक मुद्दे१ एप्रिलपासून मोफत तांदूळ उपलब्ध : कोरोना उपाययोजना सुरू,जिल्हा पुरवठा विभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये,यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु केले. १ ते ७ एप्रिल २०२० या सात दिवसात जिल्ह्यातील १ लाख ६३ हजार ५०० शिधापत्रिकाधारकांना ५१ हजार क्विंटल धान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांनी सांगितले.
गोंदिया जिल्ह्यात अन्नधान्याची टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ अन्वये कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही पात्र शिधापत्रिकाधारकांची लाभार्थ्यांची संख्या २ लाख १८ हजार ५४४ कार्ड संख्या व त्यावरील लोकसंख्या १० लाख २१ हजार ५८१ इतकी आहे. या लाभार्थ्यांना ९९८ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेंतर्गत २ रूपये किलो दराने प्रती कार्ड १० किलो गहू आणि ३ रूपये किलो दराने प्रती कार्ड २५ किलो तांदूळ दिला जातो. त्याचप्रमाणे २० रूपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते. तर प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना २ रूपये किलो दराने प्रती व्यक्ती २ किलो गहू आणि ३ रुपये किलो दराने प्रती व्यक्ती ३ किलो तांदूळ दिला जातो.

प्रत्येक व्यक्तीला ५ किलो मोफत तांदूळ
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र शिधापत्रिकाधारकाने नियमीत स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ५ किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची सूचना केंद्र शासनाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दिलेली आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र शिधापत्रिकाधारकाला नियमीत धान्य घेतल्यानंतर प्रती व्यक्ती ५ किलो तांदूळ एप्रिल महिन्यापासून कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जास्त दराने वस्तूंची विक्र ी केल्यास कारवाई
जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे. मात्र सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक ठिकाणाहून तक्र ारी प्राप्त होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्र ी केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग,वैध मापनशास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांनी दिली आहे.

Web Title: Distribution of 5100 metric tonnes of paddy in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.