नक्षलग्रस्त शालेय मुलामुलींना सायकल वाटप ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:27 AM2021-02-14T04:27:25+5:302021-02-14T04:27:25+5:30
पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस उपमुख्यालय देवरी येथे भेट दिली असता नक्षलग्रस्त भागातील पोलीस भर्ती पूर्व प्रशिक्षणात घेत ...
पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस उपमुख्यालय देवरी येथे भेट दिली असता नक्षलग्रस्त भागातील पोलीस भर्ती पूर्व प्रशिक्षणात घेत असलेले ४० मुले व १४ मुली असे एकुण ५४ प्रशिक्षणार्थ्यांपैंकी मैदानी व लेखी चाचणीमध्ये चांगली कामगिरी दाखविणारे (मुले) धीरज देवाजी राऊत, रूनाल राऊत, संदीप रामजी शेंडे तसेच मुली प्रशिक्षणार्थ्यांमध्ये १ रेश्मा पंधरे, रिता उईके, हेमलता पदे यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. रज्जुला रेवहसिंह हिडामी रा. लवारी, जि. गडचिरोली, श्रेहर्ष रामटेके रा. देवरी जि. गोंदिया, सोनम ठाकरे रा. चाना/कोडका जि. गोंदिया, गंगा कुंभरे रा. कन्हाळगाव जि. गोंदिया या गरजवंत मुले व मुलींना पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालींदर नालकुल, देवरीचे ठाणेदार, नक्षल सेल देवरी प्रभारी अधिकारी, सी-६० पथक देवरी येथील पोलीस अधिकारी उपस्थित होते.