मांग-गारुडी समाज बांधवांना जातप्रमाणपत्र वाटप ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:32 AM2021-08-19T04:32:44+5:302021-08-19T04:32:44+5:30
मांग-गारुडी या समाजातील व्यक्ती समूहाने उदरनिर्वाहासाठी बाराही महिने भटकत असतात. त्यामुळे त्यांचे वास्तव्याचे ठिकाण कायमस्वरूपी नसते. हा समाज खूपच ...
मांग-गारुडी या समाजातील व्यक्ती समूहाने उदरनिर्वाहासाठी बाराही महिने भटकत असतात. त्यामुळे त्यांचे वास्तव्याचे ठिकाण कायमस्वरूपी नसते. हा समाज खूपच अशिक्षित असल्यामुळे त्यांच्या जातीबाबतच्या नोंदीचे कागदोपत्री पुरावे जातीचे प्रमाणपत्र देणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्यांकडे सादर करू शकत नाहीत. त्यामुळे भटक्या जमातीतील काही जातीच्या लोकांना ते मागासवर्गीय असूनसुद्धा जातीची प्रमाणपत्रे मिळू शकत नाहीत. ही अडचण दूर करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या वतीने १६ जुलै रोजी ग्राम कुडवा येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २५० लोकांचे जातप्रमाणपत्र तयार करण्यात आले होते व त्यांचे वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील मेंढे, आमदार डॉ.परिणय फुके, विनोद अग्रवाल, अभिजित वंजारी, विजय रहांगडाले, सहेषराम कोरोटे, माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे, माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाधिकारी नयना गुंडे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, सहायक जिल्हाधिकारी अनमोल सादर, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पुराम, नगरपालिकेचे मुख्याधिकारी करण चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसीलदार आदेश डफळ, अपर तहसीलदार अनिल खडतकर, समाज कल्याणचे सहायक आयुक्त डॉ. मंगेश वानखडे यांच्यासह इतर विभागाचे प्रमुख उपस्थित होते.