भात व तूर पिकांचे प्रमाणित बियाणे वितरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:36 AM2021-06-09T04:36:25+5:302021-06-09T04:36:25+5:30

भात पिकाचे साकोली-९, डीआरआर ४६, एमटीयू ११५३ या वाणांच्या प्रति २५ किलो बॅगेची किंमत रु. ११२५ असून, अनुदानावर रु. ...

Distribution of certified seeds of paddy and tur crops | भात व तूर पिकांचे प्रमाणित बियाणे वितरण सुरू

भात व तूर पिकांचे प्रमाणित बियाणे वितरण सुरू

googlenewsNext

भात पिकाचे साकोली-९, डीआरआर ४६, एमटीयू ११५३ या वाणांच्या प्रति २५ किलो बॅगेची किंमत रु. ११२५ असून, अनुदानावर रु. ६२५ ला उपलब्ध आहे. को-५१ या वाणाचे प्रति २५ किलो बॅगची किंमत रु. १०० असून, अनुदानावर रु. ५०० ला उपलब्ध आहे. पीकेव्ही तिलक १० किलो बॅगची किंमत रु. ५२० असून, अनुदानावर ३२० ला उपलब्ध आहे. पीकेव्ही-किसान १० किलो बॅगची किंमत ४७० असून, अनुदानावर २७० रुपये उपलब्ध आहे. आयआर ६४, सुवर्णा व कर्जत ३ बियाणांचे २५ किलो बॅगची किमत १०२५ रुपये असून, अनुदानावर रु. ७७५ ला उपलब्ध आहे. पीकेव्ही -एचएमटी २५ किलो बॅगची किंमत रु. ११५० असून, अनुदानावर रु. ९०० ला उपलब्ध आहे. एमटीयू १०१०, एमटीयू १००१ बियाणांच्या २५ किलो बॅगची किंमत ९५० असून, अनुदानावर रु. ७०० उपलब्ध आहे. तूर पिकामध्ये पीकेव्ही- तारा, या वाणाच्या २ किलो बॅगची किमत रु. २६० असून, अनुदानावर रु. १६० ला उपलब्ध आहे.

Web Title: Distribution of certified seeds of paddy and tur crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.