मानसिक आजारग्रस्तांना औषध वितरण ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:35 AM2021-09-04T04:35:01+5:302021-09-04T04:35:01+5:30
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुळकर्णी (डोंगरवार) यांना परिसरातील मानसिक आजारग्रस्तांना सुलभरीत्या सल्ला मार्गदर्शन व मोफत औषध ...
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुळकर्णी (डोंगरवार) यांना परिसरातील मानसिक आजारग्रस्तांना सुलभरीत्या सल्ला मार्गदर्शन व मोफत औषध उपलब्ध होण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील मनोविकार तज्ज्ञांना महिन्यातून एकदा प्राथमिक आरोग्य केंद्रात बोलविण्यात येते. मानसिक आजारग्रस्तांना सल्ला व मार्गदर्शन करून तपासणी प्रसंगी जिल्हा सामान्य रुग्णालयातील मनोविकार तज्ज्ञ डॉ. लोकेश चिरवतकर, पीएचसीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुळकर्णी, वैशाली थूल, मीना रेवतकर उपस्थित होते. डॉ. चिरवतकर म्हणाले की, वारंवार विचारमग्न राहून चिंता करणे शरीर स्वास्थ्याला घातक आहे. आजाराची विविध लक्षणे आहेत. मानसिक आजारग्रस्तांनी मनात शंका न ठेवता, नियमित औषधोपचार केल्यास मानसिक आजारावर मात करता येते. ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना उपचार करणे सहज शक्य व्हावे, यासाठी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत मानसिक आजारग्रस्तांना सल्ला देऊन मोफत औषधोपचार दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.