मानसिक रुग्णांवर उपचार करुन मोफत औषधीचे वाटप ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:22 AM2021-06-06T04:22:05+5:302021-06-06T04:22:05+5:30
बोंडगावदेवी : प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुळकर्णी यांनी परिसरातील मानसिक आजारग्रस्तांना नियमित औषधोपचार व्हावा, ...
बोंडगावदेवी : प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुळकर्णी यांनी परिसरातील मानसिक आजारग्रस्तांना नियमित औषधोपचार व्हावा, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात मनोविकार तज्ज्ञास महिन्याकाठी बोलविले आहे.
मनामध्ये भीती न बाळगता नियमित औषधोपचार केल्यास मानसिक आजारावर मात करता येते असे जिल्हा सामान्य रुग्णालयातील मनोविकार तज्ज्ञ डॉ. लोकेश चिरवतकर यांनी मनोविकार आजारग्रस्तांचे समुपदेशन करताना सांगितले. ग्रामीण भागातील मानसिक आजार ग्रस्तांना नियमित औषधोपचार व्हावा. ग्रामीण भागातील सामान्य जनतेला वारंवार जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे शक्त होत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रातच औषधोपचार होण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुळकर्णी यांनी दर महिन्याकाठी सेवा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा सामान्य रुग्णालयातील मनोविकार तज्ज्ञ डॉ. लोकेश चिरवतकर यांनी ठिकठिकाणाहून आलेल्या मानसिक आजारग्रस्तांची तपासणी केली. एकांतात बडबड करणे, चिडचिडपणा निर्माण होणे, झोप न येणे, अर्ध किंवा पूर्ण डोके दुखणे, यासारख्या विविध कारणाने मानसिक आजार होण्याचा संभव असतो. मानसोपचार पद्धतीने नियमित औषधोपचार केल्यास मानसिक आजारावर मात करता येते. ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला उपचार करणे सहज शक्य व्हावे, यासाठी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत मानसिक रुग्णांना सल्ला देवून मोफत औषधोपचार केले. परिसरातील २२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी मानसोपचार तज्ञ अमित वागदे, मीना रेवतकर, वैशाली थूल उपस्थित होते.