पाच हजार कामगारांना नोंदणी प्रमाणपत्र वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 09:11 PM2018-07-14T21:11:16+5:302018-07-14T21:12:57+5:30
येथील पंचायत समितीच्या भव्य आवारात शनिवारी (दि.१४) दुपारी १२ वाजता अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत बांधकाम व इतर कामागरांच्या शासकीय योजनाकरिता नोंदणी व मेळावा आयोजित करण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : येथील पंचायत समितीच्या भव्य आवारात शनिवारी (दि.१४) दुपारी १२ वाजता अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत बांधकाम व इतर कामागरांच्या शासकीय योजनाकरिता नोंदणी व मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी पाच हजार कामगारांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले, आ. विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, माजी आ. हेमंत पटले, दिलीप चौधरी, रेखलाल टेंभरे, डॉ. लक्ष्मण भगत, नगराध्यक्ष आशिष बारेवार, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, सभापती माधुरी टेंभरे, खोमेश्वर रहांगडाले, न.प.उपाध्यक्ष सुरेश रहांगडाले, समाजकल्याण सभापती विश्वजीत डोंगरे, सुरेंद्र बिसेन, हिरालाल रहांगडाले, रेवेंद्रकुमार बिसेन, जि.प. सदस्य रोहीनी वरखडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती योगराज पारधी, तहसीलदार अरविंद हिंगे, उपविभागीय अधिकारी तळपाते, सहायक कामगार आयुक्त राजू गुल्हाने, खंडविकास अधिकारी सुभाष लिल्हारे, सीता रहांगडाले, पुष्पराज जनबंधू, संजय बारेवार, अनंत ठाकरे, पंकज रहांगडाले, मुख्याधिकारी हर्षिला राणे प्रामुख्याने उपस्थित होते. पालकमंत्री बडोले म्हणाले, विश्वकर्मा सन्मान योजनेत मजुरांना जीवन सन्मानाने जगता यावे, म्हणून शासनाने ही योजना सुरु केली आहे. यात २८ प्रकारच्या योजना असून गोंदिया जिल्ह्यातील सर्व कामगारांची नोंदणी होणार असल्याचे सांगितले. तर आमदार रहांगडाले यांनी कामगारांना नोंदणी करण्याचे आवाहन केले.
ही योजना एखाद्या पक्षाची, जातीची, धर्माची नाही तर ती शासनाची योजना आहे. म्हणून हा कामगार मेळावा आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक कामगार आयुक्त राजू गुल्हाने व संचालन पी.एम. गंगापारी यांनी केले.