महाआवास अभियानांतर्गत तालुकास्तरीय पुरस्कारांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:34 AM2021-08-18T04:34:39+5:302021-08-18T04:34:39+5:30
महाआवास अभियान-२०२१ च्या शासन निकषानुसार नियोजन आराखड्यानुसार घरांच्या विहित मुदतीत बांधकाम, किचन ओटा, लादी, शौचालय, पाऊस पाणी संकलन व ...
महाआवास अभियान-२०२१ च्या शासन निकषानुसार नियोजन आराखड्यानुसार घरांच्या विहित मुदतीत बांधकाम, किचन ओटा, लादी, शौचालय, पाऊस पाणी संकलन व फळझाडे लावणे आदींची पूर्तता करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याअंतर्गत, कोसबी ग्रामपंचायतला प्रथम पुरस्कार, द्वितीय पुरस्कार चिरचाडी ग्रामपंचायत व तृतीय पुरस्कार भुसारीटोला ग्रामपंचायतने पटकाविला. राज्य पुरस्कृत रमाई-शबरी आवास योजनेंतर्गत घरकुलाचे उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतमध्ये प्रथम पुरस्कार कोसबी ग्रामपंचायत, द्वितीय पुरस्कार पाटेकुर्रा ग्रामपंचायत, तर तृतीय पुरस्कार कोहमारा ग्रामपंचायतने पटकाविला.
तसेच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलाचे उत्कृष्ट बांधकाम काम करणारे लाभार्थी अमृत मारोती तरोणे (कोसबी) यांनी प्रथम, हिरकना भीमराव चौधरी (पाटेकुर्रा) यांनी द्वितीय, तर रामचंद्र माधव कोरे (बाम्हणी) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. रमाई-शबरी आवास योजनेंतर्गत घरकुलाचे उत्कृष्ट काम करणारे विलास रामदास वट्टी (बाम्हणी-खडकी) यांनी प्रथम, द्वितीय पुरस्कार भूवनलाल गोवर्धन भोयर (चिखली), तर तृतीय पुरस्कार मंगेश श्रीराम सातभावे (बोथली) यांनी पटकावला. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलाचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल ग्रामीण गृहनिर्माण अभियंता आशिष कापगते व रमाई-शबरी आवास योजनेंतर्गत घरकुलाचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल ग्रामीण गृह निर्माण अभियंता हार्दिक ब्राह्मणकर यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांच्यापासून प्रेरणा घेऊन तालुक्यातील ज्या ग्रामपंचायत पुरस्कारासाठी यावर्षी पात्र ठरल्या नाहीत त्यांनी पुरस्काराच्या निकषानुसार बांधकाम करून आपल्या ग्रामपंचायतींना सन्मान मिळवून द्यावा यासाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी मैत्रीपूर्ण स्पर्धा निर्माण करावी असे मत आमदार चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले.