अपंगांना ट्रायसिकल व व्हीलचेअरचे वितरण

By admin | Published: August 10, 2016 12:16 AM2016-08-10T00:16:32+5:302016-08-10T00:16:32+5:30

गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे आमदार राजेंद्र जैन यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात सोमवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Distribution of tricycles and wheelchairs to disabled people | अपंगांना ट्रायसिकल व व्हीलचेअरचे वितरण

अपंगांना ट्रायसिकल व व्हीलचेअरचे वितरण

Next

राजेंद्र जैन यांचा पुढाकार : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स सेमीनार
गोंदिया : गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे आमदार राजेंद्र जैन यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात सोमवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून घेतलेल्या या कार्यक्रमात प्रामुख्याने अपंग मुलांना साहित्यांचे वाटप करण्यासह विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स, सरकारी रुग्णालयांमध्ये जलशुद्धीकरण यंत्र आणि फळांचे वाटप करण्यात आले.
अपंगांना ट्रायसिकल व व्हीलचेअरचे वाटप करण्याचा कार्यक्रम त्यांच्या निवास्थानासमोर झाला. त्यानंतर एनएमडी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स सेमीनारचे आयोजन केले होते. त्याचा शेकडो विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. स्थानिक बाई गंगाबाई महिला रुग्णालय तसेच केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात जलशुद्धीकरण यंत्र देऊन रुग्णांना फळांचे वितरण करण्यात आले. याशिवाय गौशाला येथे व नंतर जिल्हा परिषद शाळा कुडवा येथे विद्यार्थ्यांना टिफीन बॉक्सचे वाटप करण्यात आले. गोंदियातील एमआयईटी कॉलेज आणि पांढराबोडी शाळेत रक्तदान शिबिर, तिरोडा येथील कृऊबा समितीत युवा शेतकरी परिषद, सी.जे.पटेल कॉलेज तिरोडा येथे मेडिकल चेकअप कॅम्प, गोरेगाव तालुक्यातील रामाटोला, मलपुरी, सिलेगाव येथे विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले.महागाव येथे शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी शिबिर तथा भूमिपूजन तर कोरंभीटोला प्राथमिक आरोग्य केंद्रात फळ वाटपासह इतर कार्यक्रम झाले. आ.जैन यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून त्यांच्या निवासस्थानी नागरिकांनी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. याशिवाय त्यांना खा.प्रफुल्ल पटेल, वर्षा पटेल, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा.विजय दर्डा, पक्षनेता धनंजय मुंडे, राज्य मंत्रिमंडळातील सदस्य पंकजा मुंडे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी दूरध्वनीवरून त्यांचे अभिष्टचिंतन केले.

Web Title: Distribution of tricycles and wheelchairs to disabled people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.