जिल्ह्यात ठिकठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी
By admin | Published: August 3, 2015 01:31 AM2015-08-03T01:31:41+5:302015-08-03T01:31:41+5:30
जिल्ह्यात ठिकठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा कारण्यात आला. रामनगर
गोंदिया : जिल्ह्यात ठिकठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा कारण्यात आला.
रामनगर
बाल विकास शिक्षण संस्थेतर्फे संचालित सरस्वती शिशु मंदिर प्राथमिक शाळा रामनगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य जे.यू. कटरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. अतिथी म्हणून शेखर पारधी, मुख्याध्यापिका रेखा बोरकर उपस्थित होते. सुभदा बांडेबुचे, प्रांजली कुथे, साक्षी हनवते, श्रद्धा ढोमणे, श्रुती शहारे व मेहूल सातव यांनी गुरुपौर्णिमेविषयी माहिती दिली. समिर बारबुद्धे, जितेंद्र हटवार, खुशी वैद्य, साक्षी भेंडारकर यांनी गीत सादर केले. संचालन सलोनी काटेकर तर आभार बोरकर यांनी मानले. कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगिताने झाला. यशस्वीतेसाठी रेखा बोरकर, तेजकुमार चौधरी, प्रेमकुमार मेश्राम, माधव नान्हे, झनक शेंडे, रोशन जैन, राजेंद्र नागपुरे, कुंदा खरकाटे, नेहा कुळकर्णी, प्रणिता लोणारकर यांनी सहकार्य केले.
महिला पतंजली
महिला पतंजली गोंदिया येथील गुरुपौर्णिमा उत्सव जिल्हाध्यक्ष लक्ष्मी आंबेडारे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. अतिथी म्हणून विश्व हिंदू परिषदेच्या संयोजिका मंगला जायस्वाल, शमी इटानकर, कल्पना समरीत, दीपा काशिवार, शारदा चौबे, शशी तिवारी, कांचन इटानकर, प्रेरणा फुलबांधे, लता गभणे, नर्मदा मुनेश्वर उपस्थित होत्या.
मृणाल कोचिंग क्लासेस
गणेश नगरातील मृणाल कोचिंग़ क्लासेस व संस्कार ज्ञान शिक्षा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नरेंद्र असाटी यांच्या अध्यक्षतेखाली गुरु पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करून सरस्वती वंदना सामूहिकरित्या गायन्यात आली. यावेळी नरेंद्र असाटी यांनी भारतीय संस्कृतित गुरुचे महत्व विशद केले. प्रभु, माता-पिता सोबत गुरुचे स्थान श्रद्धा, निष्ठा व सन्मानजनक राहीला आहे. याला पुढे नेण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. यावेळी नरेंद्र असाटी, योगेश ब्राम्हण, युवराज पारधी, भारती ढेकवार, मनिषा नारसन्ने, खुमेश बघेले, गौरव पटले, प्रतिक मेश्राम या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
एक्यूट पब्लिक स्कूल
संज्योत मल्टिपर्पज सोसायटीतर्फे संचालित एक्युट पब्लिक स्कुल येथे संस्थाध्यक्ष गीता भास्कर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. अतिथी म्हणून सचिव संजयकुमार भास्कर, सहसचिव सुभा शहारे, प्राचार्य रामेश्वर ठाकूर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. गीता व पथनाट्य सादर करून विद्यार्थ्यांनी विविध विषयांची माहिती दिली. सचिव संजय भास्कर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी रामेश्वर ठाकूर, उज्ज्वला पारधी, चंद्रकला बसेने, प्रशांत गोडबोले, अर्चना मानकर, छाया राणा, मनोज मडामे, रचना बेले, प्राची पटले, ललिता कुथे, सुषमा नागपुरे, स्वाती दमाहे, वैशाली चांदेवार, करण क्षीरसागर, अनिता नेवारे, बुनेंद्र मारगाये यांनी सहकार्य केले.
बोधिसत्व बुद्धविहार
बोधीसत्व बुद्धविहार छोटा गोंदिया येथे गुरुपौर्णिमा उत्सव देवराम मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी अतिथी म्हणून सी.झेड. गजभिये, पांडूरंग गजभिये, सुशील गणविर, आनंद बन्सोड उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुशील गणवीर तर आभार ममता बोरकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी शोभा रामटेके, अल्का बन्सोड, दिपीका रंगारी, विद्या गणवीर, शोभा रंगारी, सुधा गजभिये, रत्नमाला मेश्राम, अनुसया उके, मिरण मेश्राम, माधुरी घोडेश्वार, गुड्डी वैद्य, तरासन बन्सोड, सुनिता चव्हाण यांनी सहकार्य केले.
किरसान पब्लिक स्कूल
गणखैरा येथील किरसान इंटरनॅशनल पब्लिक स्कूल येथे गुरूपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सरस्वती वंदना शिक्षक बोरकर यांनी गायली. यावेळी संस्थापक एन.डी.किरसान यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका राखी वालीया यांनी मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी शैलेंद्र शर्मा, रामपूरकर, शेंडे, ठाकरे, चंद्रिकापुरे यांनी सहकार्य केले.
बनाथर
जि.प.हायस्कुल बनाथर येथे मुख्याध्यापिका एस.एस. कटकवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. अतिथी म्हणून जे.एस. शेख, एम.एन. भौतिक, एस.बी. तंगडपल्लीवार, सुनील दिघोरे, प्रभाकर रहांगडाले, आर.के. कटरे, साठवणे, ठाकरे, बसेने उपस्थित होते. यावेळी वर्ग प्रतिनिधी व शाळा प्रतिनिधी यांनी शिक्षकांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू दिल्या. सारिका केकती, अजय खरे, प्रसिक लांजेवार, शालिनी जतपेले, हिमांशू बागळे यांनी गुरुचे महत्व सांगितले.
साखरीटोला
साखरीटोला महाविद्यालय साखरीटोला येथे गुरु पौर्णिमा उत्सव प्राचार्य एम.पी. बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. अतिथी म्हणून प्रा. एम.जे. दिहारी, व्ही.आर. बहेकार, व्ही.डी. सुलाखे, ए.आर. बोरकर, डी.जी. तिरपुडे, एस.बी. कटरे, ए.आर. बडवाईक, पी.एल. देशमुख उपस्थित होते. संचालन स्वाती बावनकर तर आभार पुजा तावाडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी राजेश चुटे, राहुल रहांगडाले, धम्मदीप शहारे, शैलेष फुंडे, निकिता कटरे, रागिणी खोटेले यांनी सहकार्य केले.
नवेगावबांध
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय नवेगावबांध येथे गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन मुख्याध्यापक आर.जी. गजघाटे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिथी म्हणून धनराज निखाडे, विजय जनबंधू, किशोर शंभरकर, मुकुंद काशिवार, गोविंदा पर्वते, चंदूलाल डोंगरवार, कमल घरडे उपस्थित होते. संचालन संजय पुस्तोडे व आभार अशोक कांबळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी यशवंत हुमणे, शालीक मेश्राम यांनी सहकार्य केले.
तिरोडा
जि.प. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य एन.एस. रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गुरुचे महत्व, ग्रंथ संपदा, महर्षी व्यास यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. संचालन एम.आर. मरकाम, प्रास्ताविक व्ही.पी. भालाधरे तर आभार ए.बी.ढोले यांनी मानले.
बिर्सी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिर्सी येथे मुख्याध्यापक एल.यू. खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. अतिथी म्हणून बबीता बिसेन, ममता चौधरी, वर्षा बावनथडे, विकास लंजे उपस्थित होते. यावेळी पूजा अर्चना करण्यात आली. संचालन गिलेश्वरी रिनाईत तर आभार वर्षा बावनथडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी व्ही.डब्ल्यू. लंजे, मिरा कुळसुंगे, अनिता पंधरे यांनी सहकार्य केले.
अर्जुनी मोरगाव
सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी मोरगाव येथे प्राचार्य अनिलकुमार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. अतिथी म्हणून पर्यवेक्षीका विना नानोटी, मुख्याध्यापक हरिदास गहाणे, लिना मिसार, मुकेश शेंडे, जुगल राठी उपस्थित होते. यावेळी सामूहिक गीताचे गायन करण्यात आले. संचालन छाया तर आभार इंद्रनील यांनी केले.
मक्काटोला
पंचशिल हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय मक्काटोला येथे गुरुपौर्णिमा उत्सव प्राचार्य व्ही.डी. मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. अतिथी म्हणून शिक्षक आर.एम. मुनेश्वर, टी.के. चौधरी उपस्थित होते. यावेळी गुरुवर मार्गदर्शन करण्यात आले. संचालन व आभार एस.एस. फुंडे यानी केले.
सातगाव
जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा सातगाव येथे गुरु पौर्णिमा उत्सव अनंतराम राऊत यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. अतिथी म्हणून केंद्रप्रमुख ए.सी. अंबादे, रामदास हत्तीमारे, सविता नंदेश्वर, एल.जी. बारई, दीपलता हत्तीमारे, अंजना शहारे, प्रकाश राऊत, हरिंद्र शहारे, उर्मिला बहेकार उपस्थित होते. यावेळी सर्वांनी ओंकार वंदना केली. कार्यक्रमाचे संचालन आर.वाय. गजभिये तर आभार डी.जी. असाटी यांनी मानले. यशस्वीतेसाठी के.एस. बोकडे, डी.एफ. बघेले, कावळे व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
कोसमतोंडी
संत बांगळुबाबा आदिवासी शैक्षणिक सुधारणा मंडळ मालुटोला द्वारा संचालित फुलीचंदजी भगत विद्यालय कोसमतोंडी येथे व्यासपूजेचा कार्यक्रम गुरूपौर्णिमा म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टी.एस. येळेकर होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य बी.बी. येळे, टी.आर. झोडे, एच.टी. बिसेन व एम.एच. मेंढे उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी गुरू-शिष्यावर आधारित अनेक गीत गायले आणि शिक्षकांनी देखील मार्गदर्शन केले.
कोमल वलथरे, मुशकॉन शर्मा, प्राची येळे, हीना बिसेन यांनी गीत व भाषण सादर केले. (ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून)