जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात

By admin | Published: October 17, 2016 12:38 AM2016-10-17T00:38:06+5:302016-10-17T00:38:06+5:30

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या पावन दीक्षाभूमिवर १४ आॅक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.

In the district, the celebration of Dhamchachra Entrance Day | जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात

जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात

Next

गोंदिया : विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या पावन दीक्षाभूमिवर १४ आॅक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. तसेच आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. हा एतिहासिक दिवस ६० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
बाह्मणी-खडकीमध्ये भीमज्योत
बाम्हणी : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने येथील बौद्ध बांधवांच्या वतीने बुद्ध विहारात सलग पाच दिवसीय भीमज्योत कार्यक्रम घेतला. तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
उद्घाटन डॉ. सूरसाऊत यांच्या हस्ते, डॉ. भूषण मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिथी म्हणून अनिल दोनोडे, सरपंच रमेश इळपाते, कृष्णा ठलाल, देवानंद तागडे, सरपंच शारदा मेश्राम, गजभिये, बोरकर, साधू तागडे, वामन गजभिये, भीमराव रामटेके, मोरेश्वर मेश्राम, हिरालाल गजभिये उपस्थित होते. पाच दिवसपर्यंत विविध कार्यक्रम घेण्यात आले. संचालन राजेश मेश्राम यांनी केले. आभार प्रदीप मेश्राम यांनी मानले.
बुद्धविहार धम्मप्रचार समिती
बिजेपार : बुद्ध धम्मात मानवी जीवनाचा उत्कर्ष आहे. धम्म माणसाला आशावादी बनवितो. स्वाभिमानाची प्रेरणा धम्मातूनच मिळते. हजारो वर्षे अधिकारापासून वंचित शोषितांना बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा देवून त्यांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून दिला. गुलामगिरी व विषमतेच्या श्रृंखला तोडून न्याय, समता, स्वातंत्र्य व बंधुता या मूल्यांची प्रतिष्ठापना केली व या सर्व बाबी आम्हाला दीक्षेमुळे मिळाल्या, असे प्रतिपादन प्रबोधनकार शैलेंद्रकुमार टेंभुर्णीकर यांनी केले.
बिजेपार येथे बुद्धविहार धम्मप्रचार समितीच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते मार्गदर्शन करीत होते.
अध्यक्षस्थानी शंकरराव बडोले होते. अतिथी म्हणून सरपंच नितू वालदे, पोलीस पाटील वनिता वाघमारे, अ‍ॅड. शंभरकर, हरिशचंद्र वाघमारे, जे.जे. कोचे, पं.स. सदस्य दिलीप वाघमारे, राजेंद्र वालदे उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, बुद्धाचा धम्म देशविदेशात पोहोचला. परंतु भारतात मात्र शोषित-वंचित काही अल्पजणांनीच धम्म स्वीकारला. इतर भारतीय त्यापासून कोसो दूर आहे, ही खेदाची बाब आहे. तथागत बुद्ध व बाबासाहेबांचा संघर्ष व्यवस्था परिवर्तनासाठी होता. ज्ञान, धन व सत्ता यापासून ज्यांना नेहमी वंचित ठेवण्यात आले, त्यांच्या मानवी न्याय्य हक्कासाठी होता, असे ते म्हणाले.
कार्यक्रमासाठी ऋषभ वालदे, निखिल चंद्रिकापुरे, अभिषेक अंबादे, अशोक शहारे, दिलीप बंसोड, मुस्कान वालदे, दिपाली बंसोड, ऋतू भैसारे, कृतिका भैसारे यांनी सहकार्य केले.
करूणा बुद्ध विहार
केसलवाडा : येथील करूणा बुद्ध विहारामध्ये ६० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी अध्यापक पी.डी. रामटेके होते. अतिथी म्हणून खुशाल शहारे, एम.ए. रामटेके, रनभिड शेंडे, अनिल शहारे, शंकर शहारे, सुखदास बन्सोड, अनिल शेंडे, भाऊदास मेश्राम, कृष्णा शहारे, अजय घोडीचोर उपस्थित होते. संचालन अशोक शहारे यांनी केले. आभार खुशाल शहारे यांनी मानले.
गोठणगावात धम्मरॅली
गोठणगाव : येथील वार्ड एक व तीनमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. धम्मरॅली काढून समतेचे नारे लावण्यात आले. सकाळी पोलीस निरीक्षकांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच शकुंतला वालदे होत्या. सामूहिक धम्मवंदना घेण्यात आली. सायंकाळी ४ वाजता शांतीच्या मार्गाने धम्मरॅली काढण्यात आली. हातात निळे झेंडे व मेणबत्ती घेवून ही रॅली वार्डांमध्ये फिरली. दोन्ही वार्डात सामूहिक भोजन देण्यात आले. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमासाठी तंमुसचे अध्यक्ष सचिन डोंगरवार, स्वच्छता समिती अध्यक्ष दीपक राऊत, दिनदयाल रामटेके, कांतिलाल डोंगरवार, मिथून टेंभुर्णे, रवी टेंभुर्णे, विजय तिरपुडे, प्रवीण भोवते, प्रवीण शहारे, सौरभ राऊत, मुन्ना शहारे, माणिक रामटेके, विमल बडोले, हर्षद वालदे, विक्की कराडे, मनोज रामटेके आदींनी सहकार्य केले.

Web Title: In the district, the celebration of Dhamchachra Entrance Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.