फुटलेल्या कालव्याची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 09:56 PM2018-04-16T21:56:02+5:302018-04-16T21:56:02+5:30

The district collector of the melt canal surveyed | फुटलेल्या कालव्याची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

फुटलेल्या कालव्याची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी आंभोºयाजवळ फुटलेल्या कालव्याची पाहणी केली.
गोंदिया शहराला भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पुजारीटोला धरणातून कालव्याद्वारे डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेजवळ वैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत होते. दरम्यान हा कालवा आंभोऱ्याजवळ फुटल्याने पाण्याचा मोठा अपव्यय झाला. त्यामुळे पुजारीटोला धरणातून पाणी सोडणे तात्काळ बंद करण्यात आले. शनिवारी (दि.१४) जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी आंभोऱ्याजवळ फुटलेल्या कालव्याची पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता छप्परघरे उपस्थित होते. फुटलेल्या कालवा दुरूस्तीचे काम जलसंपदा विभागाच्या जेसीपीद्वार करण्यात येत आहे. यापुढे पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले. त्यामुळे लवकरच पुजारीटोला धरणातून कालव्यावाटे वैनगंगा नदीपात्रात सोडण्यात येणारे पाणी डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होईल.

Web Title: The district collector of the melt canal surveyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.