जिल्हाधिकाऱ्यांनी केली सिरपूर जलाशयाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 11:31 PM2019-05-14T23:31:54+5:302019-05-14T23:33:00+5:30
मागील वर्षी कमी प्रमाणात झालेला पाऊस आणि यावर्षी तापमानात झालेली वाढ यामुळे यंदा पाणी टंचाईची बिकट समस्या निर्माण झाली आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना वेळेत सुरू करण्यात आल्या नाही. त्यामुळे अनेक गावातील नागरिकांनी पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरपूरबांध : मागील वर्षी कमी प्रमाणात झालेला पाऊस आणि यावर्षी तापमानात झालेली वाढ यामुळे यंदा पाणी टंचाईची बिकट समस्या निर्माण झाली आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना वेळेत सुरू करण्यात आल्या नाही. त्यामुळे अनेक गावातील नागरिकांनी पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. दरम्याची याची दखल घेत जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी देवरी तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांना भेट दिली. तसेच सिरपूर जलाशयाची पाहणी केली.
सिरपूरबांध, मकरधोकडा, शिलापूर, पदमपूर या वाघ नदीलगत असलेल्या गावांमध्ये यंदा पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. वाघ नदीचे पात्र एप्रिल महिन्यातच कोरडे पडल्याने या परिसरातील गावातील विहिरी आणि बोअरवेलनी तळ गाठला आहे. त्यामुळे पहाटेपासूनच महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. विशेष म्हणूजे याच तालुक्यातील मोठे सिरपूर जलाशय असून या जलाशयाचे पाणी या परिसरातील गावकऱ्यांना मिळत नसल्याने गावकºयांमध्ये नाराजीचा सूर आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी गुरुवारी (दि.९) ग्रामपंचायत सिरपूरबांधला भेट देवून पाणी टंचाई संदर्भात प्रत्यक्ष पाहणी केली.संबंधित विभागाच्या अधिकाºयांना यावर वेळीच उपाय योजना करण्याचे निर्देश दिले. सिरपूर जलाशय हे गावालगत असून एप्रिल-मे महिन्यात या जलाशयातून दरवर्षी पाणी सोडले जाते.त्यामुळे बाघ नदीमध्ये बाराही महिने पाणी वाहत असल्याने परिसरातील गावकºयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत नाही. परंतु यावर्षी जलाशयात पुरेसा पाणी साठा उपलब्ध असून सुद्धा पाणी का सोडण्यात येत नाही असा प्रश्न गावकºयांनी जिल्हाधिकाºयांना केला. त्यानंतर जिल्हाधिकारी बलकवडे यांनी बाघ इटियाडोह प्रकल्पाच्या शाखा अभियंता यांच्यासह सिरपूर जलाशयाला भेट दिली.पाणीसाठा पाहिल्यानंतर लवकरच पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, पंचायत विभाग, कृषी विभागाचे अधिकारी, ग्रा.पं.पदाधिकारी व ग्रामवासी उपस्थित होते.