११ कर्मचाऱ्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 12:40 AM2018-10-06T00:40:55+5:302018-10-06T00:41:19+5:30

जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी गुरूवारी (दि.४) नगर परिषद कार्यालयात आकस्मिक भेट देऊन एकच खळबळ माजवून दिली. या भेटीत त्यांनी कार्यालयात उपस्थित नसलेल्या ११ अधिकारी- कर्मचाऱ्यांची यादी तयार करवून नेली असल्याची माहिती आहे.

District Collector's list of 11 employees | ११ कर्मचाऱ्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे

११ कर्मचाऱ्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे

googlenewsNext
ठळक मुद्देनगर परिषदेत आकस्मिक भेट : कार्यालयात एकच खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी गुरूवारी (दि.४) नगर परिषद कार्यालयात आकस्मिक भेट देऊन एकच खळबळ माजवून दिली. या भेटीत त्यांनी कार्यालयात उपस्थित नसलेल्या ११ अधिकारी- कर्मचाऱ्यांची यादी तयार करवून नेली असल्याची माहिती आहे. त्यामुळे सध्या नगर परिषद कार्यालयात एकच खळबळ असून सर्वांच्या नजरा आता जिल्हाधिकारी काय कारवाही करतात याकडे लागल्या आहेत.
एक कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी म्हणून कादंबरी बलकवडे यांची ओळख आहे. कामात हलगर्जीपणा त्या खपवून घेत नसल्याबाबत ऐकीवात असून त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे भल्याभल्यांची त्यांच्या नावानेच झोप उडत असल्याचे बोलल्या जाते. आजवर कित्येक जिल्हाधिकारी आले मात्र कुणीही नगर परिषद कार्यालयातील प्रत्येक विभागात जाऊन पाहणी केली नाही. अशात मात्र जिल्हाधिकारी बलकवडे यांनी गुरूवारी (दि.४) दुपारी नगर परिषद कार्यालयात अचानक भेट दिली.
या भेटीत त्यांनी आस्थापना विभागातील कर्मचारी भूपेंद्र शनवारे यांना सोबत घेत सर्व विभाग दाखविण्यास सांगीतले. त्यानुसार, बलकवडे यांनी, नगर परिषदेतील सर्वच विभागांची पाहणी केली. तसेच जे अधिकारी-कर्मचारी आपल्या कार्यालयात उपस्थित नव्हते त्यांची नावे नोंद करण्यास शनवारे यांना सांगीतले. विशेष म्हणजे, कोण कुठे गेले याबाबत कुणालाही न विचारता फक्त नाव नोंद करण्याचे आदेश शनवारे यांना देण्यात आले. त्यानुसार, शनवारे यांनी जिल्हाधिकारी बलकवडे यांना नगर परिषद कार्यालयातील सर्वच विभाग दाखविले. तसेच आपल्या विभागात उपस्थित नसलेल्या सुमारे ११ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे नोंद करून त्यांचा दिल्याची माहिती आहे. या यादीत प्रशासनीक अधिकाºयांचेच नाव असल्याचेही नगर परिषद वर्तुळात बोलले जात आहे.
स्वच्छतागृहाची तीनदा सफाई करण्याची सूचना
जिल्हाधिकारी बलकवडे यांनी स्वच्छता विभागात भेट दिली असता तेथील आरोग्य निरीक्षकांना स्वच्छतागृहाची दुर्गंधी येत असल्याचे सांगत किती वेळा सफाई होते याबाबत विचारणा केली. आरोग्य निरीक्षकांनी दिवसातून दोन वेळा सफाई केली जात असल्याचे उत्तर दिले. यावर त्यांनी शौचालयांची दिवसातून तीन वेळा सफाई करण्याच्या सूचना आरोग्य निरीक्षकांना केली.
कारवाईकडे सर्वांच्या नजरा
जिल्हाधिकारी कामातील हलगर्जीपणे खपवून घेत नसल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. यामुळे जे कर्मचारी जिल्हाधिकारी पाहणी करण्यासाठी आल्या त्यावेळी उपस्थित नव्हते त्यांची चांगलीच धाकधूक होत आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: यादी तयार करवून नेली असल्याने काय कारवाई होते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Web Title: District Collector's list of 11 employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.