शिक्षक परिषदेचे जिल्हा अधिवेशन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 08:27 PM2018-12-27T20:27:41+5:302018-12-27T20:27:57+5:30
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे दोन दिवसीय जिल्हा अधिवेशन देवरी येथील माँ धुकेश्वरी मंदिराच्या सभागृहात नुकतेच उत्साहात पार पडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे दोन दिवसीय जिल्हा अधिवेशन देवरी येथील माँ धुकेश्वरी मंदिराच्या सभागृहात नुकतेच उत्साहात पार पडले.
मुख्य सत्राचे उद्घाटन आ.संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष ओमप्रकाशसिंह पवार होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूर विभागाचे शिक्षक आ. नागो गाणार, विभाग अध्यक्ष के.के. वाजपेयी, राज्य महिला आघाडी प्रमुख पूजा चौधरी, विभाग कार्यवाह योगेश बन, कार्याध्यक्ष पांडुरंग गहूकर, उपाध्यक्ष राधेशाम पंचबुद्धे, कार्यालय मंत्री अजय भोयर, महेंद्र मेश्राम, विरेंद्र अंजनकर, जिल्हा कार्यवाह गुणेश्वर फुंडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षाची जबाबदारी जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे यांनी पार पाडली. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून करण्यात आली. प्रास्ताविकातून जिल्हा कार्यवाह गुणेश्वर फुंडे यांनी महाराष्टÑ राज्य शिक्षण परिषदेच्या कामाचा आढावा सादर केला. शहारे यांनी निसर्गरम्य देवरी तालुक्याची वैशिष्टपूर्ण माहिती दिली. पुराम म्हणाले की मागील सरकारच्या काही चुकीच्या धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात अनेक समस्या जन्माला आल्या. त्या दुरुस्ती करीत शिक्षक हितासह शिक्षक हिताच्या दृष्टिकोनातून विद्यमान सरकार गांर्भियाने काम करीत असल्याचे सांगितले. शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी अनेक उपाययोजना राबवित आहे.येणाऱ्या काळात याचे अपेक्षित परिणाम पाहायला मिळतील. गाणार म्हणाले, एक शिक्षक आमदार म्हणून विधीमंडळात काम करताना राष्टÑहित, शिक्षण हित आणि शिक्षक हित या बीद्र वाक्याला अनुसरुन पावले उचलली.
सरकार कोणाचे आहे हे न बघता शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल कसे घडवून आणायचा यावर जास्त भर दिल्याचे सांगितले. पहिल्या दिवशीच्या सत्रात शिक्षकांच्या विविध समस्या आणि तक्रार निवारण कार्यक्रम घेण्यात आला. दुसºया दिवशी सकाळच्या सत्रात शाळांना अनुदान देण्याच्या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
शेवटचे सत्र खुल्या अधिवेशनाचे घेण्यात आले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी विभाग अध्यक्ष के.के. बाजपेयी होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपाध्यक्ष विजय मानकर, रतिराम डोये, कार्याध्यक्ष भैयालाल कनोजे, आतिश ढाले, छत्रपाल बिसेन, गुणेश्वर फुंडे, राजेंद्र तोमर, विरेंद्र राणे, मधुकर चौधरी, प्रभाकर कावडे, घनशाम पटले उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जिनेंद्र रहांगडाले यांनी केले तर आभार भोजराज फुंडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी उमेश चंदन गिरी, प्रेमचंद सेवईवार, मंगेश पटले, गुलाब नेवारे, के.एस.बिसेन, उमेश कापगते, शंभुदेव मुरकुटे, प्रदीप मेश्राम, यु.डी. बिसेन, मानसिंग ठाकूर, गजानन चंदीवाले, येवेंद्र पारधी, अनिल कटरे, सी.के.पुस्तोडे, बी.एस.बिसेन,यशवंत गौतम, बी.पी. डोंगरवार, आर.एस.गायधने, तुळशीराम सलामे, एस.टी.मेश्राम, ए.आर. चांदेवार यांनी सहकार्य केले.