जिल्ह्यात ठिकठिकाणी वृक्ष लागवडीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2017 12:49 AM2017-07-08T00:49:08+5:302017-07-08T00:49:08+5:30
शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. शाळा-महाविद्यालयांसह विविध संस्था व कार्यालयांच्या परिसरातही रोपटी लावण्यात आली.
मरठा कलार समाज
गोंदिया : गोरेगाव तालुका वनविभाग व क्षत्रिय मरठा कलार समाजाच्या संयुक्तवतीने समाजाचे जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे यांच्या नेतृत्वात ग्राम मलपुरी येथे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी एक व्यक्त एक झाड संकल्पनेला साकार करण्याचा संकल्प उपस्थितांनी घेतला. कार्यक्रमाला समाजाचे सचिव शरद डोहळे, कोषाध्यक्ष नारायणसाव कावळे, सहसचिव राजू धुवारे, सदस्य अरविंद धपाडे, तिलकचंद बारेवार, धर्मेंद्र डोहरे, संजय बारेवार, जितू कावळे, हिराला धपाडे, भय्यालाल बारेवार, लोकेश कावळे, महेश धपाडे, हिरालाल राऊत, खुशाल धपाडे, भास्कर गंगभोज उपस्थित होते.
मानवता पूर्व माध्य. शाळा
गोंदिया : येथील मानवता पूर्व माध्यमिक शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला असून यानिमित्त शाळेतून प्रभातफेरी काढण्यात आली. प्रभातफेरीतून वॉर्डात झाडे वाचविण्याचा संदेश देण्यात आला. त्यानंतर शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला मुख्याध्यापक बी.एफ.बालपांडे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
न.प.माताटोली हायस्कूल
गोंदिया : नगर परिषद संचालीत माताटोली हायस्कूलमध्ये बुधवारी (दि.५) शालेय परिसरात वृक्ष लागवड कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एन.एस.कुंभरे होते. याप्रसंगी नगरसेवक दिलीप गोपलानी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. संचालन एस.के.माने यांनी केले. आभार बी.डी.बसोने यांनी मानले. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
नेहरू युवा केंद्र
गोंदिया : नेहरू युवा केंद्र व सायना बहुउद्देशीय युवा मंडळाच्यावतीने ग्राम मोरवाही येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच सुरेश कावडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील विनोद ठाकूर, हेमंत बोपचे, धरमलाल धुवारे, आरोग्य केंद्राच्या कटरे, काशिनाथ मेश्राम, गेंदलाल ठाकूर, धर्मवीर वैद्य व गावकरी उपस्थित होते. याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. प्रास्तावीक हेमंत बोपचे यांनी मांडले. आभार धर्मवीर वैद्य यांनी मानले. कार्यक्रमासाठी अंकिता घेरकर, अरविंद मोटघरे, दिगंबर मोटघरे, पंकज मोटघरे, पूनम मेश्राम यांनी सहकार्य केले.
संस्कार इंग्लिश
प्रायमरी स्कूल
गोंदिया : धम्मचक्र शिक्षण संस्थेद्वारा संचालित संस्कार इंग्रजी प्राथमिक शाळेत जागतिक पर्यावरण सप्ताह साजरा करण्यात आला. या दिवसाच्या निमित्ताने शाळेचे संचालक मधू बन्सोड यांच्या मार्गदर्शनाखाली झाडे लावण्यात आली व मुलांना पर्यावरणाचे संतूलन कसे राखावे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री फुले व सिंधू धोटे यांनी वृक्ष लावा, वृक्ष जगवा, वृक्ष लावा पर्यावरण वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानिमित्त वृक्षवल्ली आम्ही सोयरी वनचरे या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनीू या दिवसाचे महत्व समाजावून वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.
मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालय
गोरेगाव : मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्राम पालेवाडा येथील वन क्षेत्रात सुमारे ९०० रोपट्यांची लागवड केली. याप्रसंगी तहसीलदार कल्याण डहाट, वनक्षेत्र अधिकारी यादव, पंचायत समिती सदस्य अल्का काटेवार, सरपंच निकाजी डहारे, तंटामुक्त समिती अध्यक्ष तुकाराम दानी, पोलीस पाटील परिमल ठाकरे यांच्यासह विद्यार्थी रमेश लिल्हारे, संतोष रेड्डी, भुपेंद्र मेश्राम, सत्यम मेश्राम, शुभम मेश्राम, मयुर मेश्राम, उपेंदर मालोथ, तुषार नाकाडे उपस्थित होते.
नगर पंचायत
अर्जुनी-मोरगाव : वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत नगर पंचायतर्फे प्रत्येक प्रभागासह मोकळ्या ठिकाणी १५०० झाडे लावली जात आहेत. मुख्याधिकारी किरण बागडे, नगराध्यक्षा पोर्णिमा शहारे, नगरसेविका येणू ब्राम्हणकर, प्रज्ञा गणवीर, वंदना शहारे, हेमलता घाटबांधे, वंदना जांभुळकर यांनी वृक्षारोपण केले. यावेळी विनायक मडावी, दुर्योधन नेवारे, कमल कोहरे, आनंदराव मडावी आदिंनी वृक्षारोपण केले.
नवजीवन विद्यालय
सौंदड : ग्राम राका येथील नवजीवन विद्यालयात वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. वृक्ष लागवडीच्या जनजागृतीसाठी वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातामध्ये वृक्ष देऊन वृक्ष दिंडी काढण्यात आली. या दरम्यान अनेक घोषवाक्य व जयघोषात जनजागृती करण्यात आली. ही वृक्ष दिंडी संपूर्ण गवामध्ये फिरवून प्रत्येकाने एक झाड लावावे व ते स्वत:ह प्रमाणे त्याला जगवावे अशी माहिती गावकऱ्यांना देण्यात आली. यावेळी मुख्या. पी. एम. चुटे, सचिव आर.एस. शहारे, विद्यालयाचे सर्व शिक्षक व कर्मचारी तसेच ग्रामपंचायतने सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
श्री गुरुदेव ग्राम उद्धार सेवा ट्रस्ट
सौंदड: श्री गुरुदेव ग्रामउद्धार सेवा ट्रस्टचेवतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सरपंच उमाव कापगते, पतीराम घरत, मुक्ता टी. हत्तीमारे, डॉ. पी.एम. हत्तीमारे, तुलाराम घरत, गुलाब देशपांडे, प्राची लाडे, संतोष लाडे, महेश कापगते व गावकरी उपस्थित होते.
उल्हास पूर्व माध्य. शाळा
सालेकसा : ग्राम सोनारटोला येथील उल्हास पूर्व माध्यमिक शाळेत शाळेच्या मुख्याध्यापक एस.पी.कटरे यांच्या मार्गदर्शनात वृक्षा रोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. प्रामुख्याने शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कैलाश कुंजाम, बी.जी. सेवईवार, एम.पी. उपवंंशी,
एस.बी. माहुले, ए.डी. चौधरी, ए.एम. सोनबर्से, एम.ए. मेश्राम, एस.जे. घारपींडे यांच्यासह शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.
वन्यजीव विभाग
सडक-अर्जुनी : नवेगाव-नागझीरा व्याघ्र प्रकल्प वनपरिक्षेत्र कार्यालय डोंगरगाव डेपो अंतर्गत येणाऱ्या पितांबरटोला गावातील सर्व नागरिकांनी श्रमदानातून अभयारण्य प्रवेशद्वार शेजारील गावाराण जागेवर १०० रोपांची १०० क्यक्तींनी एका तासात रोपाची लागवड केली.
पितांबरटोला, मासूलकसा, नवाटोला, मंगेझरी, सहाकेपार, डोंगरगाव डेपो , डॉ. शामप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनांच्या माध्यमातून ३ हजार वृक्षझाडे वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी जि.प. सदस्य उषा शहारे, डोंगरगाव डेपोचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन शिंदे, साकोलीचे सहायक वनसंरक्षक पाटील, वनक्षेत्र सहायक आर.एम. तिबुडे, डब्ल्यू. एस. अलोने, वनरक्षक संजय कटरे, एस.आर. सोनवाने, आर.डी. बर्रीया, रुचिता राऊत, एस.एम. बरैय्या, तरुण बेलकर, जाधव,के.आर. फुंडे, दिलीप पंधरे, मिलींद पटले, संजय माळी आदी उपस्थित होते.
शासकीय आश्रमशाळा
शेंडा/कोयलारी : येथील शासकीय पॉलीटेक्नीक आश्रमशाळा येथे वृक्षारोपन दिन साजरा करण्यात आला.
त्या निमित्ताने वृक्षारोपनाचा संदेश देत गावातून रॅली काढण्यात आली. त्यात विद्यार्थी व शिक्षकवृंद उपस्थित होते.वृक्षारोपणाचा संदेश रॅलीतून देण्यात आला.