जिल्ह्यात मलेरियाचे पाच वर्षात २६ बळी

By admin | Published: June 8, 2017 02:04 AM2017-06-08T02:04:08+5:302017-06-08T02:04:08+5:30

हिवतापामुळे मृत्यू होऊ नये यासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहे. मागील पाच वर्षात

The district has 26 victims in five years of malaria | जिल्ह्यात मलेरियाचे पाच वर्षात २६ बळी

जिल्ह्यात मलेरियाचे पाच वर्षात २६ बळी

Next

 ३२९ गावात डासनाशक फवारणी : मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी प्रशासनाचा खटाटोप
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : हिवतापामुळे मृत्यू होऊ नये यासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहे. मागील पाच वर्षात मलेरियाने २६ जणांचा बळी गेला असला तरी यंदा एकाही व्यक्तीचा मृत्यू नाही. तसेच दरवर्षीच्या तुलनेत यंदा फक्त मलेरियाचे ९८ रूग्ण आढळले आहेत. मलेरियावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील ३२९ आदिवासी व मलेरियाचा उद्रेक राहाणऱ्या गावात डासनाशक फवारणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत मुख्य कार्यपालन अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली.
गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलदृट्या संवेदनशील आहे. तसेच गोंदिया जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मलेरियाचे रूग्ण आढळतात. परंतु सालेकसा व देवरी या दोन तालुक्यात मलेरियाच्या रूग्णांची संख्या सर्वाधीक आहे. सन २०१२ मध्ये ४ लाख ४० हजार ७५५ रूग्णांची तपसणी केली. त्यात ७५४ रूग्ण आढळले. त्यातील ७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सन २०१३ मध्ये ४ लाख ४० हजार ८३६ रूग्णांची तपसणी केली. त्यात ५९४ रूग्ण आढळले. त्यातील ४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सन २०१४ मध्ये ४ लाख ९९ हजार ४८७ रूग्णांची तपसणी केली. त्यात १४६५ रूग्ण आढळले. त्यातील ९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सन २०१५ मध्ये ४ लाख ६७ हजार ८० रूग्णांची तपसणी केली. त्यात १४१५ रूग्ण आढळले. त्यातील ५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सन २०१६ मध्ये ४ लाख ९५ हजार २८६ रूग्णांची तपसणी केली. त्यात ९२० रूग्ण आढळले. त्यातील एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. सन २०१५ च्या मे पर्यंत १ लाख ४७ हजार ३८९ रूग्णांची तपसणी केली. त्यात ९८ रूग्ण आढळले. त्यासर्वांना वाचविण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. यावेळी जिल्हा हिवाताप अधिकारी डॉ.डी.एस. टेंभूर्णे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी चांदेकर व इतर अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील ३६ गावात १२ हजार मच्छरदान्या वाटप करण्यात आल्या आहेत. ६ हजार ४२३ मच्छरदाण्या आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांना यंदा वाटप करण्यात आल्या आहेत.१३०० किलो डासनाशक पावडर फवारणी करण्यासाठी उपलब्ध आहे. मलेरियावर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी क्लोरोक्वीनच्या गोळ्या सर्व आशा स्वयंसेविकांकडे तसेच प्रत्येक गावातील जेष्ट नागरिकांकडे देण्यात आल्या आहेत.

हिवताप नियंत्रणासाठी यांचे सहकार्य
आरोग्य विभाग हिवताप नियंत्रणासाठी पोलीस विभाग, वनविभाग, नगर परिषद, जिल्हा माहिती विभाग, मत्स्य विभाग, शिक्षण विभाग, परिवहन विभाग, कृषी विभाग, बांधकाम विभाग, महिला व बालकल्याण, पंपायत विभाग, आदिवासी विकास प्रकल्प, स्वयंसेवि संस्था यांचीही मदत घेणार आहेत.

५३४ गप्पी मासे केंद्र
डास नियंत्रणासाठी डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी आरोग्य शिक्षण देण्यासाठी अतिसंवेदनशील भागात गटसभा घेण्यात येत आहेत. डास नियंत्रण करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपक्रेंद्रातंर्गत २६२ गप्पी मासे केंद्र व शहरात २७२ गप्पीमासे केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी नियमीत गप्पीमासे सोडण्याचे काम आरोग्य कर्मचाऱ्यांकडून होत असल्याची माहिती देण्यात आली.

 

Web Title: The district has 26 victims in five years of malaria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.