जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 06:00 AM2020-03-19T06:00:00+5:302020-03-19T06:00:24+5:30

हवामान विभागाने जिल्ह्यात १७ ते २१ मार्च दरम्यान जिल्ह्यात वादळी पाऊस व गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज काहीसा खरा ठरला. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध, केशोरी, गोठणगाव या परिसरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे रब्बी पिकासह मिरची आणि टरबुजाच्या वाड्यांचे सुध्दा नुकसान झाले.

The district is hit by untimely rains again | जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा

जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा

Next
ठळक मुद्देरब्बी पिकांचे नुकसान : उत्पादन घटणार,वातावरणातील बदलाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली.अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका पांढरी, नवेगावबांध, सडक अर्जुनी आणि गोंदिया तालुक्याला बसला. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मूंग, तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
हवामान विभागाने जिल्ह्यात १७ ते २१ मार्च दरम्यान जिल्ह्यात वादळी पाऊस व गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज काहीसा खरा ठरला. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध, केशोरी, गोठणगाव या परिसरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे रब्बी पिकासह मिरची आणि टरबुजाच्या वाड्यांचे सुध्दा नुकसान झाले. मागील पंधरा दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस आणि गारपीट होत असल्याने रब्बीतील गहू, हरभरा आणि भाजीपाल्याची पिके पूर्णपणे भूईसपाट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना हाती आलेली पिके गमाविण्याची वेळ आली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात मिरची आणि टरबुजाच्या वाड्या मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणी टरबुज आणि मिरची विदेशात सुध्दा पाठविली जाते. सध्या मिरचीचा पहिला तोडा सुरू असून शेतकºयांनी तोडणी केलेली मिरची वाळविण्यासाठी ठेवली आहे. मात्र अवकाळी पावसामुळे वाळत घातलेली मिरची भिजल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर टरबुजाचे पीक सुध्दा निघण्याच्या मार्गावरुन असून त्याला सुध्दा गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यामुळे हाती आलेले पीक गमाविण्याची वेळ आली आहे. तर बुधवारी (दि.१८) सकाळच्या सुमारास गोंदिया शहरासह जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली.
ढगाळ वातावरण आणि पावसामुळे रब्बीतील पिके पूर्णपणे वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच हवामान विभागाने २१ मार्चपर्यंत पाऊस आणि गारपिटीचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

३५ हजार हेक्टरमधील पिके संकटात
यंदा जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. यात सर्वाधिक २५ हजार हेक्टर क्षेत्र धानाचे आहे. तर १० हजार हेक्टरवर गहू, हरभरा या पिकांची लागवड करण्यात आली आहे.अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका गहू आणि हरभरा या पिकांना बसला आहे. त्यातच मागील पंधरा दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत असल्याने उत्पादनात घट होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित
जिल्ह्यात आक्टोबर महिन्यात आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचे सर्वेक्षण करुन अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र अद्यापही शेतकºयांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे नुकसान भरपाई केव्हा मिळणार असा सवाल शेतकºयांकडून केला जात आहे.

Web Title: The district is hit by untimely rains again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस