जिल्हास्तरीय आदिवासी संमेलन
By Admin | Published: August 14, 2016 02:03 AM2016-08-14T02:03:17+5:302016-08-14T02:03:17+5:30
विश्व आदिवासी दिनाचे औचित्य साधून सालेकसा येथे गुरूवारी जिल्हास्तरीय आदिवासी संमेलन आयोजित केले होते.
अधिकार, स्वातंत्र्यावर चर्चा : गुलामगिरीतून बाहेर पडण्याचे आवाहन
सालेकसा : विश्व आदिवासी दिनाचे औचित्य साधून सालेकसा येथे गुरूवारी जिल्हास्तरीय आदिवासी संमेलन आयोजित केले होते. आदिवासी सांस्कृतिक भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन दिल्ली येथील राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे प्रचारक तिरूमाल लोहे यांच्या अध्यक्षतेत पं.स.सभापती हिरालाल फाफनवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि.प.समाजकल्याण सभापती देवराज वडगाये, जि.प.सदस्य विजय टेकाम, गटशिक्षणाधिकारी वाय.सी.भोयर, एन.डी.वाघमारे, सुकलाल राऊत, मनिष पुसाम, माजी जि.प.सदस्य शंकरलाल मडावी, मनोहर उईके, बारेलाल वरखडे व इतर आदिवासी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाके, राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांनी देशात आदिवासीचा विकास, अधिकार, स्वातंत्र्य यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी आदिवासीची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक प्रगती बद्दल सविस्तर विचार मांडण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष लोहे यांनी आदिवासीना मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याचे आवाहन केले. आदिवासी हे भारताचे मूळ निवासी असून त्यांना त्यांचे अधिकार मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी आदिवासीनी संघटीत होऊन शासनाशी संघर्ष करण्याचे आवाहन केले.
संचालन वीरेंद्र उईके तर आभार राजेश भोयर यांनी मानले. यशस्वीतेसाठी राधेश्याम टेकाम, अरविंद सोयाम, राजेश वट्टी, लालसिंग कोडापे, सोमु कुचलाम, लखन टेकाम, संतोष उईके, मन्नेलाल आचले, गणेश उईके, रमन सलाम, राधेलाल धुर्वे, किशोर उईके, प्रशांत उईके, डी.एस.परसगाये, वसतीगृहातील विद्यार्थ्यानी सहकार्य केले. यात आदिवासी एम्प्लाईज फेडरेशन आदिवासी पिपल्स फेडरेशनचे पदाधिकारी सुध्दा सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)