जिल्ह्यात केवळ २१ टक्केच रोवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 08:47 PM2018-07-22T20:47:20+5:302018-07-22T20:48:24+5:30

यंदा खरीप हंगामात जिल्हा कृषी विभागाने प्रत्यक्ष एक लाख ७७ हजार ९४ हेक्टर क्षेत्रात धानपीक लावण्याचे नियोजन केले होते. मात्र आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ३६ हजार ७२७.३५ हेक्टरमध्येच धानाची रोवणी झाली आहे.

In the district only 21% can be planted | जिल्ह्यात केवळ २१ टक्केच रोवणी

जिल्ह्यात केवळ २१ टक्केच रोवणी

Next
ठळक मुद्देकृषी विभागाची माहिती : रोवणी २८२५३ मध्ये तर आवत्या ८४७३ हेक्टरमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : यंदा खरीप हंगामात जिल्हा कृषी विभागाने प्रत्यक्ष एक लाख ७७ हजार ९४ हेक्टर क्षेत्रात धानपीक लावण्याचे नियोजन केले होते. मात्र आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ३६ हजार ७२७.३५ हेक्टरमध्येच धानाची रोवणी झाली आहे. म्हणजेच फक्त २१ टक्के धान लागवडीचे काम करण्यात आले आहे. जवळपास अर्धा हंमाग निघून गेल्यावरही ७९ टक्के काम बाकी आहे.
जिल्ह्यात १८ हजार २०.१९ हेक्टरमध्ये धानाची रोपवाटिका घालण्यात आली. २८ हजार २५३.९५ हेक्टरमध्ये रोवणी व आठ हजार ४७३.४० हेक्टरमध्ये आवत्या अशाप्रकारे एकूण ३६ हजार ७२७.३५ हेक्टरमध्ये २० जुलैपर्यंत धानपिकांची लागवड करण्यात आली आहे. यात गोंदिया तालुक्यातील ४५ हजार ८१० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी पाच हजार १५७ हेक्टरमध्ये रोवणी करण्यात आली आहे. गोरेगाव तालुक्यातील १९ हजार ९६५ हेक्टरपैकी दोन हजार ७६३ हेक्टरमध्ये, तिरोडा तालुक्यातील २३ हजार ४०४ हेक्टरपैकी चार हजार ८४२.८५ हेक्टरमध्ये, सडक-अर्जुनी तालुक्यातील १६ हजार ६३२ हेक्टरपैकी चार हजार ८६४ हेक्टरमध्ये, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २२ हजार २२३ हेक्टरपैकी चार ४६१ हेक्टरमध्ये, आमगाव तालुक्यातील १८ हजार ९४५ हेक्टरपैकी ३२७०.१० हेक्टरमध्ये, सालेकसा तालुक्यातील १६ हजार ७०० हेक्टरपैकी चार हजार ८७०.५० हेक्टरमध्ये तर देवरी तालुक्यातील १३ हजार ४१४ हेक्टरपैकी सहा ४९८.९० हेक्टरमध्ये रोवणीचे काम पूर्ण झाले आहे. आतासुद्धा धानपिकांचे अधिक काम बाकी आहे. हळूहळू हे काम पूर्ण होईल. सध्या पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. काही दिवसांपूर्वी दमदार पाऊस बरसला व या पावसामुळे पूरजन्य स्थिती निर्माण झाली होती. परंतु सदर पाऊस शेतकऱ्यांसाठी पर्याप्त नव्हता. अतिवृष्टीनंतर आता शेतीची कामे सुरू झाली आहेत. काही शेतांमध्ये चिखल असून तेथे रोवणी व आवत्यांचे काम सुरू आहे. तसेच ज्यांच्या शेतातील रोवणी व रोपवाटिका वाहून गेल्या, त्यांच्या शेतात नव्याने रोपवाटिका घालून उगवण्याची वाट बघितली जात आहे.
अशी झाली आहे धानाची लागवड
जिल्ह्यात एकूण १८ हजार २०.१९ हेक्टरमध्ये धानाची रोपवाटिका (नर्सरी) लावण्यात आली आहे. यात गोंदिया तालुक्यात तीन हजार ५३८, गोरेगाव दोन हजार ११७, तिरोडा तीन हजार ३९.८०, सडक-अर्जुनी एख हजार ८१७, अर्जुनी-मोरगाव दोन हजार ११८, आमगाव एक हजापर ९४२.३९ सालेकसा एक हजार ५९० व देवरी तालुक्यात एक हजार ७५८ हेक्टरमध्ये रोपवाटिका लावण्यात आली आहे. तर रोवणी गोंदिया तालुक्यात चार हजार २९०, गोरेगाव दोन हजार २२०, तिरोडा चार हजार ७४५.२५, सडक-अर्जुनी चार हजार ५४२, अर्जुनी-मोरगाव चार हजार ६५, आमगाव तीन हजार १९.६०, सालेकसा चार हजार ३३४.७० व देवरी तालुक्यात एक हजार ३७.४० हेक्टरमध्ये लावण्यात आली आहे. तसेच आवत्या गोंदिया तालुक्यात ८६७, गोरेगाव ५४३, तिरोडा ९७.६०, सडक-अर्जुनी ३२२, अर्जुनी-मोरगाव ३९६, आमगाव २५०.५०, सालेकसा ५३५.८० व देवरी तालुक्यात पाच हजार ४६१.५० हेक्टरमध्ये घालण्यात आल्या आहेत.

Web Title: In the district only 21% can be planted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.