‘ग्राम उदय ते भारत उदय’साठी जिल्हा सज्ज
By Admin | Published: April 15, 2016 02:18 AM2016-04-15T02:18:02+5:302016-04-15T02:18:02+5:30
केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाच्या निर्देशानुसार ग्राम उदय ते भारत उदय कार्यक्रम १४ ते २४ एप्रिलदरम्यान राबविण्यात येत आहे.
प्रत्येक दिवशी विशेष कार्य: व्हीएचएनएससीअंतर्गत विशेष कार्यक्रम
गोंदिया : केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाच्या निर्देशानुसार ग्राम उदय ते भारत उदय कार्यक्रम १४ ते २४ एप्रिलदरम्यान राबविण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यात हे कार्यक्रम व्हीएचएनएससीच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक दिवशी एक खास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या पंचायत राज विभागाच्या निर्देशानुसार गोंदिया जिल्ह्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पासून २४ एप्रिल पर्यंत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समिती (वीएचएनएससी) अंतर्गत प्रत्येक गाव निहाय कार्यक्रमाची रूपरेषा तयार करण्यात आली आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आयोजन करण्यात येत आहे. अभियान चालविण्यासाठी व नियोजनासाठी २० एप्रिलपासून गाव निहाय व्हीएचएनएससी ची बैठक ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. बैठकीत सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, ग्राम पंचायत सदस्य, शिक्षक, आंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचा समावेश आहे.
कार्यक्रमांतर्गत २१ एप्रिल रोजी आरोग्य विषयक जनजागृतीसाठी सकाळी प्रभातफेरी काढणे, ग्रामसभेचे आयोजन करून विषयावर चर्चा करणे, गाव स्तरावर विविध विभागाच्या माध्यमातून प्राप्त निधीच्या माध्यमातून गावाचा विकासाचे नियोजन करणे, आरोग्य स्तरावर सुधारासाठी स्वच्छता, पाणीपुरवठा व स्वच्छतीसाठी प्रयत्न करणे, ग्रामीण विकासात महिलांचा सहभाग वाढविणे, गावात अनुसूचित जाती, जमाती, अपंग व मागास वर्गासाठी उपयुक्त प्रयत्न करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या सोबत २१ ते २४ एप्रिल दरम्यान शंभर टक्के गर्भवतींची नोंदणी, संस्थेतच प्रसूती,रक्त तपासणी, सर्व गटातील हिमोग्लोबीन तपासणी करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त रक्तदाब, मधुमेह, कर्करोग (स्तन कर्करोग, सर्विकल कर्करोग व इतर), तंबाखू नियंत्रण व तोंडाचा आजार या विषयावर जनजागृती करण्यात येणार आहे. ३ ते ५ रक्तदान शिबिर, मोतियाबिंदू महिलांच्या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. सिकलसेल थैलेसेमिया चा पाठपुरावा करण्यात येणार आहे. आरजीजेएवाय शिबिर, आरबीएसके महिला लाभार्थी, रेफर महिला, महिला रोग निदान उपचार, ईएसआईएस अस्पताल में आॅपरेशन शिबिर, आशा व इतर महिलांची तपासणी तज्ज्ञांद्वारे करण्यात येईल. २२ ते २४ एप्रिल दरम्यान आयुष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ५-७ आयुष शिबिर आयोजित करणे गरजेचे आहे.(तालुका प्रतिनिधी)