जिल्ह्याला मिळाले आणखी १५८०० डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:26 AM2021-04-14T04:26:12+5:302021-04-14T04:26:12+5:30

गोंदिया : लसींचा मोजकाच साठा असल्याने व तोही सोमवारी (दि. १२) संपणार असल्याने लसीकरणाला ब्रेक लागणार असे वाटत असताना ...

The district received another 15,800 doses | जिल्ह्याला मिळाले आणखी १५८०० डोस

जिल्ह्याला मिळाले आणखी १५८०० डोस

Next

गोंदिया : लसींचा मोजकाच साठा असल्याने व तोही सोमवारी (दि. १२) संपणार असल्याने लसीकरणाला ब्रेक लागणार असे वाटत असताना सोमवारी सायंकाळी जिल्ह्याला आणखी १५८०० डोस मिळाले आहेत. हे संपूर्ण डोस कोव्हीशिल्डचे असून, आता लसीकरणातील अडचण सुटली आहे. अशात आता जिल्ह्यात पुन्हा जोमाने लसीकरण करता येणार आहे.

१६ जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक व १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे मात्र लसींचा पुरवठा कमी होत असल्याचे जाणवत आहे. सुरुवातील मोठ्या प्रमाणात मिळत असलेल्या लसींचा आता मोजकाच साठा येत असून १-२ दिवसांतच तो संपत असल्याने लसीकरणाला ब्रेक लागण्याची स्थिती निर्माण होते. असाच प्रकार सोमवारी घडला होता.

जिल्ह्यातील लसींचा साठा संपल्याने शुक्रवारी (दि. ९) जिल्ह्याला ९९२० कोव्हॅक्सिन लसींच्या डोसेसचा पुरवठा करण्यात आला. या साठ्यातून शनिवारी, रविवारी व सोमवारी लसीकरण करण्यात आल्यानंतर सोमवारी साठा पूर्णपणे संपला होता. अशात मंगळवारी लसीकरणाला ब्रेक लावावा लागणार, अशी स्थिती निर्माण झाली होती. एकीकडे शासनाकडून लसीकरणावर जोर दिला जात असतानाच दुसरीकडे लस नसल्याने लसीकरणात खंड पडण्याची पाळी आली होती. मात्र सोमवारी (दि. १२) सायंकाळी जिल्ह्याला कोव्हीशिल्डचे १५८०० डोस मिळाले आहेत. त्यामुळे आता आणखी काही दिवसांचा प्रश्न सुटला आहे.

----------------------------------------

आतापर्यंत मिळाले सुमारे २.२२ लाख डोस

१६ जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरूवात झाली असून तेव्हापासून आतापर्यंत जिल्ह्याला सुमारे २२२२६० डोस मिळाले आहेत. यात १ एप्रिल रोजी ९२९२० डोसेसचा सर्वात मोठा पुरवठा करण्यात आला होता. त्यानंतर आता मात्र मोजकेच डोसेस पाठविले जात असल्याने लसीकरणाला कधी ब्रेक लागेल हे सांगता येत नाही. मात्र आतापर्यंत तरी अशी स्थिती निर्माण झालेली नाही. साठा संपण्यापूर्वीच जिल्हयाला लसींचा पुरवठा केला जात असल्याचे दिसत असून असेच सोमवारीही घडले.

---------------------------

आता नागरिकांच्या पुढाकाराची गरज

अवघ्या देशातच पुन्हा एकदा कोरोना कहर करीत असून यंदा त्याचा प्रादुर्भाव मागील वर्षा कितीतरी पट जास्त दिसून येत आहे. परिणामी मृतांची संख्याही झपाट्याने वाढत असून जिल्ह्याचे त्याचे पडसाद दिसून आले आहेत. अशात शासनाने जास्तीतजास्त लसीकरणावर भर दिला आहे. लसीकरणाने कोरोनापासून सुरक्षितता मिळणार असल्याने नागरिकांना लस घेण्यासाठी आवाहन केले जात आहे. मात्र त्यानंतरही जिल्ह्यात अद्याप कित्येकांनी लस घेतली नसल्याचे दिसते. आता कोरोना कहर बघता अशांनी स्वत: पुढे येऊन लस घेण्याची व स्वत:सह कुटुंबीयांना सुरक्षित करण्याची गरज आहे.

Web Title: The district received another 15,800 doses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.