जिल्हावासीयांनो वेळीच व्हा सावध; रुग्णसंख्या वाढतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:31 AM2021-02-24T04:31:22+5:302021-02-24T04:31:22+5:30
....... कोराेनामुक्त तालुक्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव जिल्ह्यातील चार तालुके कोरोनामुक्त झाले होते. मात्र सडक अर्जुनी, गोरेगाव, सालेकसा या तालुक्यांमध्ये ...
.......
कोराेनामुक्त तालुक्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव
जिल्ह्यातील चार तालुके कोरोनामुक्त झाले होते. मात्र सडक अर्जुनी, गोरेगाव, सालेकसा या तालुक्यांमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी पुन्हा अधिक काळजी घेण्याची गरज आहे. मास्क, सॅनिटायझर यांचा वापर आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे गरजेचे आहे.
..........
टेस्टची संख्या वाढविली
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव पुन्हा वाढत आहे. त्यामुळे आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत. तसेच आरोग्य विभागाला कोरोना टेस्टची संख्या वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात ७५० टेस्ट केल्या जात आहेत.
.............
मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करा
कोरोना संसर्ग वाढत असताना सर्वांनाच आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे. नियमित मास्क आणि सॅनिटायझरचा वापर आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे गरजेचे आहे.