दहावीच्या निकालात जिल्हा माघारला

By Admin | Published: June 14, 2017 12:33 AM2017-06-14T00:33:50+5:302017-06-14T00:33:50+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे तर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत यंदा गोंदिया जिल्हा माघारला आहे.

District return to Class X results | दहावीच्या निकालात जिल्हा माघारला

दहावीच्या निकालात जिल्हा माघारला

googlenewsNext

जिल्ह्याचा ८३.८० टक्के निकाल : सौंदडचा ओंकार चोपकर प्रथम तर अर्जुनी-मोरगावची प्राजंली कोचे द्वितीय
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे तर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत यंदा गोंदिया जिल्हा माघारला आहे. मागच्या वर्षी गोंदिया जिल्हा ८८.२३ टक्के घेऊन नागपूर विभागात प्रथम होता. मात्र या वर्षी फक्त ८३.८० टक्के निकाल लगला असून नगपूर विभागात चवथ्या क्रमांकावर आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या २२ हजार १०२ विद्यार्थ्यांनीपरीक्षेसाठी अर्ज केले होते. यतील २२ हजार ४५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील १८ हजार ४१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले अहेत. यात प्राविण्य सूचीत २ हजार ४७४ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ७ हजार ४३ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत१ हजार ३८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नागपूर विभागात गडचिरोली जिल्ह्याचा ८५.४९ टक्के निकाल लागला असून गडचिरोली पहिल्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे पुनर्रपरीक्षार्थी म्हणून ९१५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात ३५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
गोंदिया जिल्ह्यात प्रथम क्रमांक सौंदडच्या के.आर.जे. लोहिया विद्यालयाचा विद्यार्थी ओंकार केशव चोपकर याने पटकावला. त्याला ५०० पैकी ४९३ म्हणजेच ९८.६० टक्के गुण घेतले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर सरस्वती महाविद्यालय अर्जुनी मोरगाव ची प्रांजली प्रभाकर कोचे हिने ९७.४० टक्के गुण घतले. तिच्या गुण पत्रकेत १३ गुण अतिरिक्त जोडून तिचा निकाल शंभर टक्के दाखविण्यात आला. आदर्श विद्यालय आमगावची दिशा यादोराव बघेले ९६.६०, विवेक मंदिर स्कूल गोंदियाचा वैभव मेश्रामला ९६ टक्के मिळले. आदर्श विद्यालय आमगावचा शैलेश बेनीराम नागपुरे ९४.८०, हर्षल देवराम नान्हे ९४.१६, तेजश प्रवीण चंद्रागिरीवार ९३.६०, उषा सुरेश कारंजेकर ९३, शीतल डाकचंद पटले ९२.६०, केतकी सुभाष मेश्राम ९२, रितीका रामलाल ठाकरे ९०.६०, राहुल पुरूषोत्तम कुकरे ९० टक्के गुण मिळविले.
विवेक मंदिर गोंदिया येथील श्रीपद देशपांडे ९४.८०, आर्या गुप्ता ९४.४०, श्रेयश मिलिंद लांजेवार ९४.२०, भावेश संजय ठेंगडी ९४, अनुश्री राजकुमार सोनवाने ९३.२०, रागिनी राकेश अग्रवाल ९३, वैभव हिरानंद ठकरानी ९२, इशिता मुकेश अग्रवाल ९१.२०, आकृती सुधाकर निनावे ९०.८०, कृष्णा संतोष तिवारी ९०.६० टक्के गुण मिळविले.
मनोहरभाई पटेल विद्यालय देवरी येथील नितेश रमेश चौधरी ९०.४० टक्के, विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय आमगाव येथील पवन डेकाटे ९३.८०, रोहीत एल. चौधरी ९२.२०, अक्षय एस. बघेले ९१.४० व हर्षिताला ९१ टक्के गुण मिळविले. गुरूनानक इंग्रजी माध्यमिक शाळा गोंदिया येथील साक्षी हरीश वाधवानी ९२.४०, श्रृती देवेंद्रकुमार अग्रवाल ९२.२० व प्रगती प्रदीप छटवानी ९१.२० गुण मिळविले. गुजराती राष्ट्रीय विद्यालय गोंदिया गिरीष भक्तराज टेंभूर्णीकर ९२ टक्के गुण मिळविले.
सरस्वती विद्यालय अर्जुनी मोरगाव येथील ईशांत दहिकर ९७.२०, भाग्यश्री कापगते ९७, गायश कापगते ९६.४०, खुशबू शहारे ९५.२०, सागर चांदेवार ९४.२०, श्वेता चव्हाण ९४.२०, रोहन राघोर्ते ९३.८०, नूतन लंजे ९३, वैभव मस्के ९२.८०, मोनाली ठाकरे ९२.२०, श्रद्धा बडोले ९२, गोविंद पनपालीया ९१.४०, जयेश रूखमोडे ९१.४०, श्रद्धा खुणे ९१.४०, शर्वरी सांगोडे ९१.२०, माविया अनम पठान ९०.४०, अश्वीनी निर्वाण ९०.४० टक्के गुण मिळविले. सुकन्या संकल्प निकेतन विद्यालय काटी येथील सक्षम मुकेश गुप्ता याने ९० टक्के गुण मिळविले.

मुलींनीच मारली बाजी
यावेळी ११ हजार १७१ विद्यार्थी व १० हजार ९३१ विद्यार्थीनींनी फार्म भरले होते. याचपैकी ११ हजर १३२ विद्यार्थी व १० हजार ९१३ विद्यार्थीनी परीक्षेल सल्या होत्या. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८१.४० तर मुलींची टक्केवारी ८६.२५ आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.

बेस्ट आॅफ फाईव्हचे धोरण
बोर्डाचे धोरण बेस्ट आॅफ फाईव्हचे आहे. सहा विषय असले तरी ५०० गुणांचेच मुल्यांकण केले जाते. ५०० पैकी मिळालेल्या गुणांनाच पकडून सामाजिक न्याय विभागाचेही पुरस्कार दिले जाते. सहाव्या विषयाचे गुण ग्राह्य धरल्या जात नाही, अशी माहिती नागपूर बोर्डाचे सचिव पी.आर. पवार यांनी लोकमतला दिली आहे.

 

Web Title: District return to Class X results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.