जिल्हा क्रीडा महोत्सवाला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 10:52 PM2018-01-10T22:52:41+5:302018-01-10T22:53:20+5:30
तालुक्यातील सांस्कृतिक व क्रीडानगरी मुंडीपार येथे स्वदेशी जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे बुधवारी (दि.१०) थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील दहा हजार विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.
दिलीप चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : तालुक्यातील सांस्कृतिक व क्रीडानगरी मुंडीपार येथे स्वदेशी जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे बुधवारी (दि.१०) थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील दहा हजार विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.
जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन आमदार तथा महाराष्टÑ शासन लोक लेखा समितीचे अध्यक्ष गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आ. संजय पुराम, प्रमुख पाहुणे म्हणून स्वागताध्यक्ष शिक्षण सभापती तथा स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाचे अध्यक्ष पी.जी.कटरे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) उल्हास नरड, सालेकसा पं.स. सभापती हिरालाल फाफनवाडे, जि.प.सदस्या ललीता चौरागडे, गोंदिया सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष शिशुपाल पटले, पं.स. सदस्य अल्का काठेवार, ललीता बहेकार, मुरदोलीचे सरपंच शशेंद्र भगत, गटशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी, आमगावचे गटशिक्षणाधिकारी आर.पी. रामटेके, माजी शिक्षण सभापती डॉ. योगेंद्र भगत, गोंदिया जिल्हा शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विरेंद्र कटरे, उपाध्यक्ष शंकर नागपुरे उपस्थित होते.
तर आमंत्रीत पाहुणे म्हणून नुतन बांगरे, अरविंद नाकाडे, शिला पारधी, नागसेन भालेराव, वाय.एस. मुंगुलमारे, ओमेश्वरी बिसेन, शंकर चव्हाण, पवन कोहळे, एन.बी. बिसेन, सुमेधा गजभिये, विजय डोये उपस्थित होते. उद्घाटनाप्रसंगी जि.प. प्राथमिक शाळा मुंडीपारच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यावर नृत्य करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. वेगवेगळ्या वेशभुषेतील या चिमुकल्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमामुळे या कार्यक्रमाला स्थळाला कलेची किनार लागली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाचे जिल्हा सचिव यशवंत भगत यांनी केले. तर संचालन हेमंत पटले, वाय.बी. पटले, यु.पी. पारधी यांनी केले. यशस्वीतेसाठी तालुका सचिव एम.बी. पारधी, घनशाम कावळे, सचिन राठोड, रमेश बिसेन, आर.सी. बिसेन, हेमंत बिसेन, अमोल खंडाईत, हेमंत पटले, रमेश कटरे, पि.झेड. पटले, वामन गोळंगे, एल.डी. चव्हाण, रामेश्वर गोनाळे, पी.आय. गोंधर्य, एल.जी. शहारे, श्रीधर पंचभाई, एस.पी. कुंभलकर, पी.एस. रहांगडाले, अजय कुर्वे यांनी सहकार्य केले.
चार दिवस क्रीडा महोत्सवाची मेजवानी
मुंडीपार येथे चार दिवस स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाच्यावतीने स्वदेशी जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाची गावकºयांना मेजवानी मिळणार आहे. या महोत्सवादरम्यान विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळणार आहे. जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेतील सहभागी विद्यार्थ्यांकरिता, क्रीडा प्रेमीकरीता हा महोत्सव आनंदोत्सव ठरणार आहे.