जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वातंत्र्य दिन थाटात

By admin | Published: August 19, 2015 02:02 AM2015-08-19T02:02:54+5:302015-08-19T02:02:54+5:30

भारतीय स्वातंत्र्याचा ६९ वा वर्धापन दिन जिल्ह्यात ठिकठिकाणी थाटात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त ठिकठिकाणी...

In the district, there was a time of Independence Day | जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वातंत्र्य दिन थाटात

जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वातंत्र्य दिन थाटात

Next

गोंदिया : भारतीय स्वातंत्र्याचा ६९ वा वर्धापन दिन जिल्ह्यात ठिकठिकाणी थाटात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त ठिकठिकाणी ध्वजारोहणा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रॅली काढूनही तरूणांनी भारत मातेचा जयघोष करून तिरंग्याला सलामी दिली.
जी.ई.एस. हायस्कूल
मोहाडी-चोपा : कार्यक्रमाला मोहाडी ग्रा.पं.चे सरपंच धृ्रवराज पटले, उपसरपंच श्रीराम पारधी, पो.पा. केशोराव डोहळे, फुलीचंद शेंडे, नारायण बघेपे, महाविद्यालयाचे प्राचार्य ए.ए. पंढरी प्रामुख्याने उपस्थित होते.
ध्वजारोहण कार्यक्रम पार पाडल्यानंतर राष्ट्रीय हरितसेना योजनेंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला डी.आर. चौरागडे, एम.वाय. कुरैशी, एच.ए. नागपूरे, ए.पी. व्यास. जे.आर. भेंडारकर, जे.डी. शेंदरे, एस.व्ही. उके, जे.एस. विभुते तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
लक्ष्मीबाई टेंभरे विद्यालयात
गोंदिया : विद्यार्थ्यांनी गावातून विविध वेषभूषा धारण करुन प्रभातफेरी काढली. ध्वजारोहण कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर क्षीरसागर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी हेमेंद्र पाचे होते. यावेळी प्रमुख अतिथी सरपंच कल्पना रहांगडाले, उपसरपंच डॉ. योगेश बिसेन, ग्रा.पं. सदस्य भुपेश रहांगडाले, केवलचंद रहांगडाले, भुपेश रहांगडाले, राखी कटरे, सविता बोरकर, रिना आबेडारे, पो.पाटील, लोकचंद बिजेवार, तमुस अध्यक्ष संजय धरडे, माजी तमुस अध्यक्ष ओमशंकर रहांगडाले, राजू रहांगडाले, केशव कटरे, हरीचंद्र बिसेन, चुन्नीलाल रहांगडाले, रुपदास दंदरे, दोमेश रहांगडाले व ग्रामीण जनता तसेच बी.जी. बिसेन सह शिक्षक सुनिल कुसराम, लक्ष्मीकांत पटले, घरडे, प्रेम लिल्हारे, भुमेश्वरी सुलाखे आदी मान्यवर उपस्थित होते.
समर्थ हायस्कूल, दांडेगाव
गोंदिया : गावात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये विद्यार्थी व गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
हायस्कूलमध्ये ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष जगदीशप्रसाद अग्रवाल यांनी केले. तर अध्यापक विद्यालय ध्वजारोहण उपाध्यक्ष एन.एस. भालाधरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जगदीशप्रसाद अग्रवाल होते. प्रमुख अतिथी सरपंच सुरेश पटले, संस्थेचे उपाध्यक्ष एन.एस. भालाधरे, सहसचिव के.एन. सोनेवाने, नागोराव लिचडे (संस्था सदस्य), प्राचार्य अध्यापक विद्यालय प्रा. ठोंबरे, मुख्याध्यापक वाय.सी. चौधरी उपस्थित होते.
यावेळी मेघा भोयर, मयुरी भोयर, प्रतिभा गावळे, स्वेता बिसेन, सेजल चौरे, कंचन ऊईके, दिपाली गावळे या विद्यार्थिनींनी देशभक्ती गीत सादर केले तर विक्रम माहुले, दिव्या बावणकर, अश्विनी बावणकर या विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले. मानव विकास कार्यक्रमांतर्गत गरजू मुलींना मान्यवरांच्या हस्ते सायकलचे वाटप करण्यात आले. शाळेतून ९० टक्के घेऊन एसएससी परिक्षेत प्रथम आलेल्या तेजस्विनी पटले हिचा अतिथींच्या हस्ते देऊन तिचार गौरव करण्यात आला. प्रज्ञा शाळा परिक्षेत आकाश मेश्राम, आकाश बावनकर, उज्जवल मेश्राम यांनी प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल अतिथींच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. संचालक सी.एच. भैरव यांनी केले. आभार मुख्याध्यापक वाय.सी. चौधरी यांनी मानले. एच.सी. ठाकूर, रेखा कटरे, पी.एस. पारधी, सुहास चौरे, भेमुश्वर लिचडे यांनी सहाकर्य केले.
म्युनिसिपल हायस्कूल, गोविंदपूर
गोंदिया : ध्वजारोहण जेष्ठ शिक्षक एस.डी. फुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक विष्णू नागरिकर, महेंद्र उईके व प्रतिष्ठित व्यक्ती शंकराचार्य गुरुजी, विनोद पटले, शाम दगडे उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. हरित सेना प्रभारी एफ.एम. पुसाम यांच्या मार्गदर्शनात पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक एस.डी. फुंडे, आर.एस. पटले, आर.ई. डिसूजा, बी.एस. पटले, ए.जी. ब्राम्हण, के.जे. शेख, वीना बिसेन, गोविंद मारवाडे, नामदेव शेंडे, जयशंकर दगडे यांनी सहकार्य केले.
एस.एस.ए. गर्ल्स हायस्कूल
गोंदिया : शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक बिसेन यांच्या अध्यक्षतेत स्वातंत्र दिवस साजरा करण्यात आला.याप्रसंगी विद्यार्थिनींनी गीत व भाषण सादर केले. पश्चात पालक सदस्य चित्रिव यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
के.डी. भास्कर कनिष्ठ
महाविद्यालय
गोंदिया : सरपंच मेरुबाई माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य निवीशा भास्कर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सुकलाल बाहे, जितेंद्र शेंडे, उपसरपंच पेढारी शाहु, संचापक संजय भास्कर उपस्थित होते. याप्रसंगी संजय भास्कर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमासाठी व्ही.डी. रंगारी, सुलाखे अन्य शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
मानवता पूर्व माध्यमिक शाळा
गोंदिया : शाळेचे मुख्याध्यापक बी.एफ. बालपांडे यांच्या अध्यक्षतेत माजी नगराध्यक्ष सुशीला भालेराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून विश्वास बोंबार्डे, वाय.पी. भोंडेकर, एन.झेड. कावळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ए.सी. खोब्रागडे, उपाध्यक्ष सुनिल रोकडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका टी.सी. घोडेस्वार, गुणलता अतकरे उपस्थित होते. स्वातंत्र दिनाचे निमित्त साधून शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. संचालन झेड.एच. रहांगडाले यांनी केले. आभार एम.एच. शेंडे यांनी मानले.
श्री तुकाराम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, भोसा
गोंदिया : स्वातंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त संस्थाध्यक्ष सेवकराम ब्राम्हणकर, सचिव सेवकराम टेंभरे, सदस्य जैनलाल टेंभरे, माजी सरपंच धनिराम मटाले, प्रतिष्ठित नागरिक नारायण बोकडे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी सरपंच जयवंता मटाले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवराम मटाले, गावकरी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
पंचशील विद्यालय,
मक्काटोला
आमगाव : शाळा संस्थापक सचिव दिलीप मेश्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही.डी. मेश्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक एम.जी. कांबळे, वाय.एन. पाठक, यु.आर. सोनेवाने उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांचा देशभक्तीपर गीत व भाषणांचा कार्यक्रम घेण्यात आला. सोबतच पाहुण्यांच्या हस्ते शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच विविध स्पर्धांमध्ये प्राविण्यता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. शिक्षक डी.एस. साखरे यांनी संचालन करुन आभार मानले.
जानकीदेवी चौरागडे व इंदिराबेन पटेल शाळा
गोंदिया : संस्था सचिव सुरेश चौरागडे यांच्या हस्ते शाळेत ध्वजरोहण करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. मुख्याध्यापक प्रमोद चौरागडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला संचालक रेखा चौरागडे सह. पालक शिक्षक संघ तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. संचालन नीता कुंभलकर यांनी केले.
किशोर इंगळे चौक
गोंदिया : राष्ट्रदिन पर्व समारोह समितीचे संरक्षक डॉ. सुधीर जोशी यांच्या अध्यक्षतेत जिल्हा परिषद सदस्य खुशबू टेंभरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. घनशाम तुरकर, संरक्षक डॉ. के.पी. जयपुरीया, राजेंद्रसिंग चव्हाण, पुष्पा चव्हाण, द्वारकाताई सावंत, डॉ. प्रीती कटरे, छोटेलाल दुबे, अ‍ॅड. राजा बडे, संजय ओक्टे, अ‍ॅड. प्रशांत डोये व मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी तसेच कॅडेट्सनी विविध कार्यक्रम सादर केले. संचालन संयोजक अशोक इंगळे यांनी केले.
लिटिल वुड इंटरनॅशनल स्कूल
गोंदिया : महाराष्ट्र स्टेट स्टडीज बोर्ड सदस्य आशा ठाकूर, गुजराती कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य किंजल मेहता यांच्या हस्ते ध्वजरोहण करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले. तसेच ओलंपियाड परिक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरित करण्यात आले.
श्री गुरूनानक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय
गोंदिया : पंजाबी शिक्षण संस्था अध्यक्ष त्रिलोचनसिंह भाटिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संस्था सचिव जसजीतसिंह भाटिया, उपाध्यक्ष बलबीरसिंह भाटिया, कोषाध्यक्ष सुखमानसींह भाटिया, सहसचिव अरविंदसिंह भाटिया, संचालक जगींदरकौर जुनेजा, मुख्याध्यापिका अजिता गिजरे, हेमलता व्यास, मंजुलता शुक्ला, वसुधा पिंपळापुरे व अन्य उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत व भाषण सादर केले. तसेच नर्सरीच्या चिमुकल्यांनी भारत माताची झाकी सादर केली. संचालन कल्पना रिनायत, सौम्या चव्हाण व आचल रोकडे यांनी केले. याप्रसंगी शाळा परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
जि.प. प्राथमिक शाळा,
सातगाव
चिचटोला : ग्राम पंचायत सदस्य प्रेमलाल ठाकरे यांच्या अध्यक्षतेत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास हत्तीमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक वाघे, संतोष देशमुख, नंदू गायकवाड, महेश काळे, वामन चौधरी, उत्तम लांजेवार, अनंतराम राऊत, सविता नंदेश्वर, आनंदबाई राणे, वनिता कडव, नरेश कावरे, ललीत बहेकार, आशिष बारसे, विकास ठेंगडी, एल.जी.बारई व अन्य उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनानिमित्त सकाळी गावात प्रभातफेरी काढण्यात आली होती. त्यानंतर शाळेत आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गितगायन, वेशभूषा, भाषण व पोवाडे सादर केले. संचालन के.एस.बोकडे यांनी केले. आभार डी.जी.असाटी यांनी मानले. कार्यक्रमासाठी आर.वाय.गजभिये, वाय.एफ.बघेले व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
नूतन विद्यालय
गोंदिया : शिक्षण संस्था सचिव अमृत इंगळे यांच्या अध्यक्षतेत आयोजित कार्यक्रमाला मुख्याध्यापक निमजे, पर्यवेक्षक वाय.पी.बोरकर, प्रभारी कापगते प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमात आरएसपीच्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शाळा परिसरात हरित सेना शिक एस.एस.ठाकूर यांच्या मार्गदर्शनात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. संचालन एस.झेड.मेश्राम यांनी केले. कार्यक्रमासाठी फत्तेलाल परिहार व प्रशांत चोपडेसह अन्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
जीईएस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पांढराबोडी
गोंदिया : सरपंच चंदन गजभिये यांच्या अध्यक्षतेत आयोजित कार्यक्रमात शाळेतील परिचर सदाशिव जायस्वाल यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून निर्मला सुलाखे, डुलेश्वरी लिल्हारे, संजय वैद्य, धनलाल लिल्हारे, चंद्रकला वघारे, विमला दमाहे, राजेश मेश्राम, माणिक नागपुरे, धुरणलाल सुलाखे, इंद्रराज दमाहे, पोलीस पाटील दमाहे, किशोर दमाहे, भुवन नागपुरे, अजय नागपुरे उपस्थित होते.
याप्रसंगी प्राचार्य पी.डी. सचदेव व पर्यवेक्षक एस.एस. शुक्ला यांच्या मार्गदर्शनात शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. संचालन विनोद माने व क्रीडा प्रशिक्षक पी.एच. चव्हाण यांनी केले. आभार पर्यवेक्षक शुक्ला यांनी मानले.
वृद्धाश्रम
कालीमाटी : संस्था अध्यक्ष गजानन मेश्राम यांच्या हस्ते भारतमातेच्या छायाचित्राचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच जयप्रकाश मेंढे, सेवा सहकारी संस्था अध्यक्ष शामलाल दोनोडे, यवकराम कापसे, सुब्रमण्यम मेहर, रमेश झाडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष दिलीप शेंडे, राजू फुंडे, दीनदयाल थेर, विजय रगडे, बलिराम मेंढे, विजय भांडारकर, परसराम मेहर, प्रल्हाद झाडे, व्यंकट भांडारकर, कैलाश तुरकर उपस्थित होते. याप्रसंगी वृद्धाश्रमातील वृद्धांनी भजन व देशभक्ती गीत सादर केले. संचालन यमुना झाडे यांनी केले. आभार माणिक करंडे यांनी मानले.
भारतीय ज्ञानपीठ स्कूल
गोंदिया : मुख्याध्यापिका पूजा लिल्हारे यांच्या अध्यक्षतेत संस्थापक जे.पी.लिल्हारे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत तसेच समूह नृत्य सादर केले. संचालन शिवम पटले व मधुर तुपकर यांनी केले.
मुंडीकोटा परिसर
मुंडीकोटा : येथील सुभाष महाविद्यालयात जिंदसिंह पटले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कृषी मंडळ कार्यालयात पर्यवेक्षक किंदरले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषद सदस्य मनोज डोंगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस चौकी येथे पोलीस चौकी प्रमुख भोजराज भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विविध सेवा सहकारी संस्थेत अध्यक्ष गोपीचंद भेलावे यांच्या हस्ते सचिव विनोद तिजारे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. बाजार चौकात उपसरपंच देवेंद्र मंडपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पूर्व माध्यमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ. विश्वास यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर ग्राम पंचायत कार्यालयात सरपंच निर्मला भांडारकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी आंगणवाडीतील चिमुकल्यांना गणवेश वितरित करण्यात आले. शिवाय शाळा परिसरात सरपंच निर्मला भांडारकर, जिल्हा परिषद सदस्य मनोज डोंगरे, ग्राम विस्तार अधिकारी हट्टेवार, मुख्याध्यापक नान्हे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
सरस्वती विद्यालय
तिरोडा : शाळेत संस्था अध्यक्ष रत्ना पारधी यांच्या अध्यक्षतेत व सदस्य विजय पारधी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी शिष्यवृत्ती परिक्षेत प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना सत्कार करण्यात आला. संचालन सहायक शिक्षक बि.पी.पटले यांनी केले. आभार सोनम कुंभरे यांनी मानले.
जगत महाविद्यालय
गोरेगाव : प्राचार्य डॉ. निलकंठ लंजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. एस.एच.भैरम, प्रा.जे.बी.बघेले प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
नगर परिषद, पोलीस ठाणे, पंचायत समिती
तिरोडा : नगराध्यक्ष अजय गौर यांच्या हस्ते मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, उपाध्यक्ष ममता बैस, सभापती व सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या हस्ते सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. पंचायत समिती कार्यालयात सभापती उषा किंदरले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उपसभापती किशोर पारधी, खंडविकास अधिकारी दुबे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तहसील कार्यालयात तहसीलदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नायब तहसीलदार विलास कोकवार, एस.एस.मासाळ, आर.डी.पटले यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे यांच्या हस्ते, कृषी उत्पन्न बाजार समितीत मुख्य प्रशासक डॉ. चिंतामन रहांगडाले यांच्या हस्ते प्रशासक संजय बैस, डॉ. वसंत भगत, प्रभारी सचिव राघवेंद्रसिंह बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
लिटील फ्लॉवर्स हायस्कूल
गोंदिया : शाळा संस्थापक शिला बिसेन यांच्या हस्ते शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शिक्षीका प्रणाली मानकर, सांची मेश्राम, भावना गौतम, मगनस्वी काळे, ऐश्वर्या कटरे, वैशाली फरकुंडे, ऋषभ तावाडे, सुनीत खत्री, आचल बोरकर, उमा बिसेन, गुरूनुले, विनायक भाकरे, निता खत्री, शिल्पा कुत्तरमारे, पौर्णिमा गायधने, विलास टेंभरे, उमा बावनकर, ममता चौधरी, ज्योती नागपुरे यांच्या सह शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह
तिरोडा : वस्तीगृहात स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थापक संचालक के.टी.कडव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी वसतिगृहाचे अधिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
मणीभाई ईश्वरदास पटेल क.महाविद्यालय
गोरेगाव : महाविद्यालयात जी.एच. कुरंजेकर यांच्या अध्यक्षतेत आयोजित कार्यक्रमात अ‍ॅड.के.आर. शेंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. ममता सक्सेना, प्राचार्य व्ही.टी. पटले, पर्यवेक्षक आर.एच. डोमळे प्रामुख्याने उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधून पाहुण्यांच्या हस्ते शाळा परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
पंचायत समिती कार्यालय
सडक-अर्जुनी : सभापती कविता रंगारी यांच्या हस्ते, तालुका कृषी कार्यालयात विजय पेशेट्टीवार, तहसील कार्यालयात तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्या हस्ते, सुनील पूर्व माध्यमिक शाळेत धर्मराज उईके यांच्या हस्ते तर वडेगाव येथील प्राथमिक शाळेत घनश्याम मेंढे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Web Title: In the district, there was a time of Independence Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.