अटल पेन्शन योजनेत जिल्हा राज्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:27 AM2021-03-21T04:27:50+5:302021-03-21T04:27:50+5:30
या योजनेत वाशिम, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांनी सुध्दा शंभर टक्केपेक्षा अधिक उद्दिष्ट पूर्ण केले आहे. २००५ नंतर ...
या योजनेत वाशिम, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांनी सुध्दा शंभर टक्केपेक्षा अधिक उद्दिष्ट पूर्ण केले आहे. २००५ नंतर शासकीय सेवेतील तसेच कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कुठलीच पेंशन लागू नाही. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर जिवन कसे जाणार आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालणार अशी चिंता सतावित असते. सेवानिवृत्तीनंतर आपल्या गरजांसाठी कुणापुढे हात पसरण्याची वेळ येऊ नये, आपला खर्च आपल्याला भागविता यावा यासाठी अनेकजण भविष्याची तरतूद करुन ठेवतात. अशाच कर्मचारी आणि नागरिकांसाठी केंद्र सरकारने अटल पेंशन योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत १८ ते ४० वयोगटातील नागरिकांना १ ते ५ हजार रुपये दर महिन्याला भरता येतात. वयाच्या ६० वर्षांनंतर संबंधिताना या पेंशन योजनेचा लाभ दिला जात असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक उदय खर्डेणविस यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
.......
पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला पेन्शन
या पेन्शन योजनेंतर्गत दर महिन्याला पैस भरणाऱ्यांना ६० वर्षानंतर पेन्शन स्वरुपात लाभ दिला जातो. पतीचा मृत्यू झाल्यास पत्नीला पेन्शन लागू केली जाते. पती पत्नी दोघांचाही मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना सुध्दा १ लाख ७० हजार रुपये ते ८ लाख ५० हजार रुपयापर्यंत लाभ दिला जातो.