जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पाऊस गारपिटीने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 06:00 AM2020-03-07T06:00:00+5:302020-03-07T06:00:14+5:30
तालुक्यात शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरूवात झाली. गारपिटीचा सर्वाधिक तडाखा शेंडा परिसराला बसला. जवळपास अर्धा पाऊस आणि गारपिट झाल्याने रस्त्यावर आणि शेतांमध्ये गारांचा खच पडला होता. डव्वा येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात गारांचा खच पडला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : हवामान विभागाने जिल्ह्यात ६ ते १० मार्च दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज खरा ठरला. शुक्रवारी (दि.६) पहाटेच्या सुमारास गोंदिया शहरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तर दुपारच्या सुमारास सडक अर्जुनी, गोरेगाव, तिरोडा, सालेकसा, आमगाव या भागात सुध्दा वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाल्याने रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान मागील आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपीट होत असल्याने रब्बी पिकांच्या नुकसानीत वाढ होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांच्या हाती काहीच उत्त्पन्न हाती येण्याची शक्यता कमी आहे.
गारपिटीचा पिकांना फटका
सडक अर्जुनी : तालुक्यात शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरूवात झाली. गारपिटीचा सर्वाधिक तडाखा शेंडा परिसराला बसला. जवळपास अर्धा पाऊस आणि गारपिट झाल्याने रस्त्यावर आणि शेतांमध्ये गारांचा खच पडला होता. डव्वा येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात गारांचा खच पडला होता. अवकाळी आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला. यामुळे शेतकºयांना गहू, हरभरा या पिकांपासून मुकण्याची वेळ आली आहे.
गोरेगाव परिसरात अर्धातास जोरदार पाऊस
गोरेगाव : गोरेगावसह तालुक्यातील इतर भागात शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. तर काही भागात गारपीट सुध्दा झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळपास अर्धातास जोरदार पाऊस झाल्याने शेतातील बांध्यामध्ये पाणी साचल्याचे चित्र होते. तर वादळी पावसामुळे शेतातील गहू आणि हरभरा ही पिके पूर्णपणे मातीमोल झाल्याने शेतकºयांवर मोठे संकट ओढवले आहे.
सालेकसा परिसराला वादळाचा तडाखा
सालेकसा : सालेकसा तालुक्यातील लोहारा, सोनपुरी, कावराबांध या गावाना वादळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला.त्यामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास झालेल्या पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते.
लोहारा परिसरात घराचे छत उडाले
लोहारा : देवरी तालुक्यातील लोहारा परिसराला शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीचा चांगलाच फटका बसला. वादळी वाºयामुळे लोहारा येथील अनेक नागरिकांच्या घराचे छत उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर वादळी पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला.
आमगाव व तिरोड्यात पावसाची हजेरी
आमगाव : आमगाव आणि तिरोडा तालुक्याला शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला. अवकाळी पावसामुळे शेतातील बांध्यामध्ये पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांचे नुकसान झाले.