पोलीस पाटलांचे दिवाळी मिलन व सत्कार
By admin | Published: November 24, 2015 02:25 AM2015-11-24T02:25:34+5:302015-11-24T02:25:34+5:30
महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व
सडक-अर्जुनी : महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील पोलीस पाटलांचे दिवाळी मिलन व सत्कार समारंभ बौद्ध स्मारक भूमी खोडशिवनीच्या पटांगणावर पार पडले.
याप्रसंगी संघटनेचे नवनियुक्त राज्य अध्यक्ष पंढरीनाथ पाटील, कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर, महासचिव श्रीकृष्ण साळूंखे पाटील, गोंदिया जिल्हा अध्यक्ष सोमाजी शेंडे, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष हरिहर खरकाटे, भंडारा जिल्हा अध्यक्ष भोलाराम साठवणे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष योगराज ठाकरे, नागपूर जिल्हा अध्यक्ष विजय घाडगे, सचिव यशवंत ईरदंडे, श्रीराम राऊत, सुरेश मते, शरद ब्राह्मणवाडे, मोहनसिंह बघेल, मनोहरसिंह चव्हाण, किशोर तिडके, हरी पानपट्टे, सरपंच जयेंद्र राऊत, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पतिराम परशुरामकर तसेच पाचही जिल्ह्यातील संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
याप्रसंगी राज्य अध्यक्ष पंढरीनाथ पाटील यांनी सांगितले, राज्यातील पोलीस पाटलांच्या न्याय्य मागण्या मंजूर करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून त्या मंजूर करण्याचा प्रयत्न करणार. तर भृंगराज परशुरामकर यांनी सांगितले, डिसेंबर महिन्यात संघटनेचे राज्य अधिवेशन नागपूर येथे घेण्याचे निश्चित केले आहे. अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. शासनाशी संघटनेची चर्चा अंतिम टप्प्यात असून त्यात मानधन वाढीसह इतर १५ मागण्यांचा समावेश आहे. या अधिवेशनात सर्व पोलीस पाटलांनी उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी नवनियुक्त राज्य अध्यक्ष पंढरीनाथ पाटील, कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर, महासचिव श्रीकृष्ण साळूंखे पाटील यांचा पूर्व विदर्भाच्या वतीने शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. सदर नवनियुक्त राज्य समिती १ जानेवारे २०१६ पासून कार्यभार स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
कार्यक्रमासाठी मनोहर डोंगरवार, शालीकराम पटने, पुष्पा उके, गायत्री पवार, भाकरे पाटील, जीवन बोरकर, हरी पानपट्टे, मधूकर पर्वते, कवळू हलमारे, टिकाराम कापगते, प्रविण कोचे, कैलाश बडोले, नर्मदा चुटे, साहेबलाल बन्सोड, भांडारकर पाटील, कुंजिलाल भगत व सर्व उपशाखांच्या प्रतिनिधींनी सहकार्य केले.