सरकारच्या फसव्या घोषणांवर विश्वास ठेवू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 10:49 PM2019-01-25T22:49:59+5:302019-01-25T22:51:50+5:30
राज्य सरकारने आदिवासींच्या विकासात अडसर निर्माण करुन डी.बी.टी. सारख्या योजना लादून आदिवासी तरुण-तरुणींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम करीत आहेत. त्यांना वाम मार्गाकडे वळणारे हे फसवे धोरण आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : राज्य सरकारने आदिवासींच्या विकासात अडसर निर्माण करुन डी.बी.टी. सारख्या योजना लादून आदिवासी तरुण-तरुणींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम करीत आहेत. त्यांना वाम मार्गाकडे वळणारे हे फसवे धोरण आहे. वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास हिसकावून घेणारी सरकारची ही कार्यप्रणाली आदिवासींच्या जिवनाशी खेळण्याचे काम करीत आहे. सर्वसामान्य जनतेने सरकारच्या फसव्या घोषणांवर विश्वास ठेवू नये असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी केले.
तालुक्यातील ग्राम भजेपार येथील क्रांतीसूर्य भगवान बिरसामुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शुक्रवारी (दि.२५) ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्राम चोपा येथील रविंद्र विद्यालयाचे प्राचार्य एस.बी. राऊत होते. दिप प्रज्वलन जि.प. सदस्य सुनित मडावी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी झेड.जे. भोयर, भिवराम विद्यालयाचे प्राचार्य अशोक पटले, आदर्श शिक्षक जी.एन. बिसेन, आर.के. किरसान, व्ही.आर. खोब्रागडे, यू.एल. टेंभरे, आर.सी. कटरे, मूर्तिकार राधेशाम नागपुरे, आदिवासी नॅशनल पिपल्स फेडरेशन समितीचे अध्यक्ष वसंत मडावी, माजी उपसभापती धानसिंग बघेले, डॉ. तारेंद्र बिसेन उपस्थित होते.
पुढे बोलताना कोरोटे यांनी, आदिवासी समाजाने अंधश्रद्धा कमी करुन शिक्षणाकडे वळले पाहिजे, जेणे करुन समाजाचा विकास होईल. शिक्षण घेवून फक्त नोकरी करणे म्हणजे समाजाचा विकास नव्हे. एक नोकरदार फक्त बायका पोरांना शिक्षण देवू शकतो. पण एक उद्योजक अनेक लोकांना रोजगार देवून खºया दृष्टीने समाज विकास साधू शकतो. म्हणून सदर जबाबदारी स्वत:वर घ्या आणि उद्योगाकडे वळा असा सल्ला नवतरुणांना दिला. प्राचार्य पटले यांनी, समाजातील सांस्कृतिक वारसा कशाप्रकारे जतन करुन ठेवावा याबद्दल मार्गदर्शन केले. तर मूर्तिकार राधेशाम नागपुरे व इतर वक्तयांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
कार्यक्रमानिमित्त सकाळी सद्भावना रॅली काढण्यात आली व त्यानंतर रात्री समाज प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी महाराज यांच्या किर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला. संचालन रामकुमार कोसने यांनी केले. आभार किसन मडावी यांनी मानले. कार्यक्रमासाठी भाकचंद मानकर, अरुण देवगडे, लक्ष्मण घरत, धनराज किरसान, प्रभूपाल गधवार, शालीकराम कुंभरे, ललीता पंधरे, भाकचंद कोडवते, देवचंद टेकाम, आनंदराव कोळवते, दिलीप कोळवते, प्रेमलाल धुर्वे, उषा टेकाम, धुरपता किरसान यांच्यासह भजेपार परिसरातील सर्व आदिवासीबांधवांनी सहकार्य केले.