वीज कनेक्शन कापू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 09:27 PM2017-11-05T21:27:33+5:302017-11-05T21:27:46+5:30

७ तारखेनंतर राज्यातील थकबाकीदार शेतकºयांचे वीज कनेक्शन कापण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. शासनाच्या या आदेशाचा निषेध व्यक्त करीत जिल्हा कॉंग्रेस कमिटीने शेतकºयांचे वीज कनेक्शन कापण्याचे आदेश रद्द करण्याची मागणी केली.

Do not cut the power connection | वीज कनेक्शन कापू नका

वीज कनेक्शन कापू नका

Next
ठळक मुद्देकाँग्रेस कमिटीची मागणी : मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ७ तारखेनंतर राज्यातील थकबाकीदार शेतकºयांचे वीज कनेक्शन कापण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. शासनाच्या या आदेशाचा निषेध व्यक्त करीत जिल्हा कॉंग्रेस कमिटीने शेतकºयांचे वीज कनेक्शन कापण्याचे आदेश रद्द करण्याची मागणी केली. यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंत्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनानुसार, राज्यात अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी पिकांवर विपरीत परिणाम पडला आहे. तर गोंदिया जिल्ह्यात पाऊस कमी पडल्याने कृषी उत्पादनात कमी आली आहे. सोयाबीन, कापूस, धानासारख्या नगदी पिकांना बाजारात योग्य भाव मिळत नाही. तर शासकीय खरेदी केंद्र पूणपणे सुरू झालेले नाही. राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली. मात्र फक्त काहीच शेतकºयांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळाले असून त्यांच्याही खात्यात प्रत्यक्ष कर्जमाफी झालेली नाही.
उर्वरित शेतकºयांची स्थिती अत्यंत बिकट असून वीज बिल भरण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नाहीत. अशात ७ तारखेपर्यंंत त्यांच्याकडून बिलाचे पैसे भरणे संभव नाही. आतापर्यंत कित्येक शेतकºयांचे पीक पिकले नसून असात वीज कनेक्शन कापल्यास शेवटच्या एका पाण्याअभावी त्यांचे पीक हातून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने वीज कनेक्शन कापण्याचा आदेश रद्द करावा अशी मागणी जिल्हा कॉंग्रेस कमिटीने केली आहे. असे न झाल्यास जिल्हा कमिटीसह राज्य कॉंगे्रस कमिटी राज्यात तिव्र आंदोलन करणार व त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य शासन तसेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची राहणार असल्याचे निवेदनात नमूद आहे.
निवेदन देताना, जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, माजी आमदार रामरतन राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, प्रदेश सचिव विनोद जैन, डॉ. योगेंद्र भगत, जिल्हा परिषद सभापती पी.जी.कटरे, विमल नागपूरे, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, हिरालाल फाफनवाडे, झामसिंग बघेले, यादनलाल बनोटे, सहेसराम कोरोटे, अमर वºहाडे, अशोक लंजे, विशाल अग्रवाल, विठोबा लिल्हारे, सिमा मडावी, लता दोनोडे, माधुरी कुंभरे, योगराज उपराडे, हुकुमचंद बहेकार, जहीर अहमद, संदीप रहांगडाले, डेमेंद्र रहांगडाले. राधेलाल पटले, भागवत नाकाडे, धीरेश पटेल यांच्यासह जिल्ह्यातील अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Do not cut the power connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.