संकटकाळात मदतीसाठी धावून आलेल्यांना विसरू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:29 AM2021-09-03T04:29:08+5:302021-09-03T04:29:08+5:30

तिरोडा : विद्यमान खासदारांना जनतेच्या प्रश्नांशी काहीच देणे-घेणे नसून जनतेच्या मदतीसाठी धावून आले, असे कधी दिसलेच नाही. याउलट खासदार ...

Do not forget those who came to the rescue in times of crisis | संकटकाळात मदतीसाठी धावून आलेल्यांना विसरू नका

संकटकाळात मदतीसाठी धावून आलेल्यांना विसरू नका

Next

तिरोडा : विद्यमान खासदारांना जनतेच्या प्रश्नांशी काहीच देणे-घेणे नसून जनतेच्या मदतीसाठी धावून आले, असे कधी दिसलेच नाही. याउलट खासदार प्रफुल्ल पटेल यांनी कोविड काळात ऑक्सिजनची मदत, ऑक्सिजन प्लांटची कायमस्वरूपी उभारणी, इंजेक्शन, कोविड सेंटरची सुविधा यासाठी पूर्ण क्षमतेने मदत करण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांना बोनस देण्याचे काम त्यांनीच केले. त्यांच्यासारखे सक्षम नेतृत्व आपणाला लाभले आहे. यामुळे संकटकाळात जनतेच्या मदतीसाठी धावून आलेल्यांना विसरू नका, असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ग्राम सुकडी येथे आयोजित जिल्हा परिषद क्षेत्र सुकडीच्या (डाकराम) कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बैठकीला राजलक्ष्मी तुरकर, प्रेमकुमार रहांगडाले, योगेंद्र भगत, रविकांत बोपचे, कैलास पटले, मनोज डोंगरे, नीता रहांगडाले, जया धावडे, डॉ. संदीप मेश्राम, जगदीश बावनथडे, राजकुमार बोरकर, चेतना बावनथडे, योगेंद्र कटरे, शिशुपाल पटले, राजू ठाकरे, किरण बन्सोड यांच्यासह मोठ्या संख्येत कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Do not forget those who came to the rescue in times of crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.