योजनांची अंमलबजावणी करण्यास अडथळा
By admin | Published: August 26, 2014 11:32 PM2014-08-26T23:32:36+5:302014-08-26T23:32:36+5:30
गोंदिया जिल्ह्यातील पूर्व भागाला, आदिवासीबहुल अशा सालेकसा तहसील येथे पंचायत समिती स्वराज्य संस्था राबविण्यात येत आहे. येथून शासनाच्या विविध योजनांची माहिती व अंमलबजावणी करण्यात येते,
दर्रेकसा : गोंदिया जिल्ह्यातील पूर्व भागाला, आदिवासीबहुल अशा सालेकसा तहसील येथे पंचायत समिती स्वराज्य संस्था राबविण्यात येत आहे. येथून शासनाच्या विविध योजनांची माहिती व अंमलबजावणी करण्यात येते, पण शासनाच्या हलगर्जीपणाने या पंचायत समितीला अतिदुर्गम भागात असलेली तहसीलची उपेक्षा होत आहे.
शासकीय वाहन येथे उपलब्ध करण्यासाठी पंचायत समितीच्या सभापती छाया बल्हारे यांनी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा पाठवून तसेच सचिव ग्रामविकास जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई, विभागीय आयुक्त नागपुर यांना सुध्दा अशा/पत्र क. प्रसंसा/सभापती १२३६/२०१३ दि.३/६/२०१३ ला पत्र पाठवून पंचायत समितीत वाहन नसल्याने होणाऱ्या अडथळ्याची कल्पना दिली.
पत्राच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. सालेकसा हे अतिसंवेदनशील नक्षल क्षेत्रात मोडत असून येथील शासकीय योजना राबविण्यास सद्यस्थितीत महिला सभापती १३ जानेवारी २०१३ पासून कार्यरत आहेत. या पंचायत समितीमध्ये असलेली वाहन नादुरूस्त स्थितीत असून निर्लेखणाच्या कार्यवाहीस प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यालयाकडून नवीन वाहन उपलब्ध करून देण्यास वारंवार पत्रव्यवहार व पाठपुरावा सुध्दा करण्यात येत आहे. परंतू अजूनपर्यंत योग्य प्रतिसाद मिळत नाही.
अद्यापपर्यंत या कार्यालयास वाहन उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. वाहनाअभावी शासनाच्या विविध शासकीय कार्यक्रमात व सभेला तसेच शासकीय योजनांची पाहणी व अंमलबजावणी करण्यास स्वत:च्या दुचाकी वाहनाने दौरा करावा लागतो. हा एक महिला लोकप्रतिनिधीवर अन्याय होत आहे. या कामात लक्ष पुरवून या तातडीने पंचायत समिती सालेकसा या कार्यालयास अविलंब वाहन उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून शासनाच्या विविध योजना राबविणे सोयीचे होईल अशी मागणी त्यांनी केली आहे.(वार्ताहर)