दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकाशित करू नयेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 04:35 PM2024-11-12T16:35:30+5:302024-11-12T16:37:33+5:30

मतदानाच्या एक दिवस आधी होतात प्रकाशित : निवडणूक विभागाचे आदेश

Do not publish misleading advertisements | दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकाशित करू नयेत

Do not publish misleading advertisements

लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया :
भारत निवडणूक आयोगाने ७ नोव्हेंबर २०२४ च्या पत्रान्वये महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका-२०२४ मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवसपूर्वी प्रिंट माध्यमांमधून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणारया किंहा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसेल अशा जाहिराती प्रकाशित होऊ नयेत याबाबत दक्षता घेण्याबाबत निर्देश दिले आहेत.


कोणताही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका-२०२४ मतदानाच्या दिवशी म्हणजे २० नोव्हेंबर रोजी व मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजे १९ नोव्हेंबर रोजी प्रिंट मीडियामध्ये कोणतीही राजकीय जाहिरात, जोपर्यंत राज्य-जिल्हा स्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून पूर्व प्रमाणित केली जात नाही, तोपर्यंत वृत्तपत्रात प्रकाशित करू नये. 


या कालावधीत प्रिंट मीडियामध्ये राजकीय जाहिरात द्यावयाची झाल्यास अर्जदारांना ही जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रस्तावित तारखेच्या दोन दिवस आधी माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडे अर्ज करावा लागेल अशा सूचना दिल्या आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन व्हावे, असे निवडणूक विभागाकडून कळविण्यात आले आहे.

Web Title: Do not publish misleading advertisements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.