मन मारून नव्हे मन लावून काम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 09:48 PM2019-01-21T21:48:45+5:302019-01-21T21:49:19+5:30
खूप जूनी एक कथा आहे. एक ज्योतिषी राजाला सांगता झाला की, तू तीन दिवसात मरणार आहेस. राजाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. त्या ज्योतिषाच्या मित्राला कळताच तो राजदरबारी गेला व भविष्य-कथन केले की, राजा, वेळ खूप कठीण आहे, येत्या एक-दोन दिवसात राजकुमारचा राज्याभिषेक करून घ्या. राजाने या मित्र-ज्योतिषाला खूप सारी दक्षिणा दिली आणि त्याच्या विनंतीनुसार प्रथम ज्योतिषाची फाशीही रद्द केली.
गोंदिया :खूप जूनी एक कथा आहे. एक ज्योतिषी राजाला सांगता झाला की, तू तीन दिवसात मरणार आहेस. राजाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. त्या ज्योतिषाच्या मित्राला कळताच तो राजदरबारी गेला व भविष्य-कथन केले की, राजा, वेळ खूप कठीण आहे, येत्या एक-दोन दिवसात राजकुमारचा राज्याभिषेक करून घ्या. राजाने या मित्र-ज्योतिषाला खूप सारी दक्षिणा दिली आणि त्याच्या विनंतीनुसार प्रथम ज्योतिषाची फाशीही रद्द केली. दोन्ही ज्योतिषांनी एकच भविष्य-कथन करूनही त्याचे परिणाम एकदम परस्पर-विसंगत ठरले.निष्कर्ष काय? गुड बोला गोड बोला!
मी नवीन ठिकाणी बदलून गेल्यावर तेथील संपूर्ण स्टॉफची संयुक्त सभा घ्यायचो. त्या सभेत कामकाज प्रक्रि या संबंधात बोलताना आवर्जून सांगायचो की, शासन आम्हा सगळ्यांना पुरेसे वेतन-भत्ते देते, कारण आम्ही विहित, नियत, सोपविलेले काम पूर्ण सचोटी आणि ईमानदारीने करावे म्हणून. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना माझ्यासोबत आपापले विहित काम करावेच लागेल. त्यात तुम्हाला कोणतीही सवलत वा स्वातंत्र्य मिळणार नाही. पण ते काम कशा पद्धतीने करायचे, म्हणजे मन लावून करायचे की कसे करायचे याचे स्वातंत्र्य मी तुम्हाला देईन. मन लावून काम केल्यास जीवनात आनंद फुलेल आणि मन मारून काम केल्यास बी.पी.,शुगर शी दोस्ती होईल. निवड तुमची असेल. हे सर्व मी अगदी हसत-खेळत सांगायचो. याचा परिणाम असा व्हायचा की, माझ्या कार्यालयात प्रलंबित कामे जवळपास नसायचीच. कारण, गुड बोला गोड बोला!
-लखनसिंह कटरे, निवृत्त सहकार जिल्हा निबंधक व साहित्यीक.