बौद्ध सामूहिक सोहळा आयोजित करणे स्तृत्य उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 11:58 PM2019-05-02T23:58:20+5:302019-05-02T23:59:25+5:30

आमगाव येथे भारतीय बौद्ध महासभा तालुका आमगावच्या वतीने आयोजित बौद्ध सामूहिक विवाह सोहळ्यात बौद्ध समाजाची १२ जोडपी परिणयबद्ध झाली. हा परिणय सोहळा जि.प.हायस्कुल शाळेच्या भव्य प्रांगणात मंगळवारी पार पडला.

Documentary activities organized for the Buddhist communal celebrations | बौद्ध सामूहिक सोहळा आयोजित करणे स्तृत्य उपक्रम

बौद्ध सामूहिक सोहळा आयोजित करणे स्तृत्य उपक्रम

googlenewsNext
ठळक मुद्देसंजय पुराम : सामूहिक विवाह सोहळ्यात १२ जोडपी परिणयबद्ध

लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : आमगाव येथे भारतीय बौद्ध महासभा तालुका आमगावच्या वतीने आयोजित बौद्ध सामूहिक विवाह सोहळ्यात बौद्ध समाजाची १२ जोडपी परिणयबद्ध झाली. हा परिणय सोहळा जि.प.हायस्कुल शाळेच्या भव्य प्रांगणात मंगळवारी पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष भरत वाघमारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आ.संजय पुराम व सविता पुराम, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष देवाराम मेश्राम, महासचिव मिलन गजभिये, राजेश मेश्राम, अरविंद सूर्यवंशी, नरेंद्र मेश्राम, डॉ. दोशांत हुमणे, डॉ.अभय बोरकर, रमन हुमे, प्रशांत मेश्राम, प्राचार्य व्ही.डी. मेश्राम, गटशिक्षणाधिकारी सुकचंद वाघमारे, रामेश्वर शामकुंवर, उत्तम नंदेश्वर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या छायाचित्रासमोर दीप प्रज्वलन करुन मार्ल्यापण करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभेच्या संस्कार व नियमाप्रमाणे केंद्रीय शिक्षक देवाराम मेश्राम यांनी विवाह विधी पार पाडला. भारतीय बौद्ध महासभा आमगावच्या वतीने नवदाम्पत्यास संसारोपयोगी भांडी देण्यात आली.
डॉ. प्रतिभा वाघमारे यांच्याकडून बुद्धवंदनेचे पुस्तक भेट देण्यात आले. मालिनी बोरकर यांनी नवदाम्पत्यास बुध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ भेट दिला.डॉ. दोशांत हुमणे यांनी बौद्ध विवाह सोहळ्यामुळे वेळेची व पैशाची बचत होत असल्याचे सांगितले. आ. संजय पुराम यांनी बौद्ध सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणे काळाची गरज आहे.
भारतीय बौद्ध महासभेच्या या स्तृत्य उपक्रमाची प्रशंसा केली व नवदाम्पत्यास शुभेच्छा दिल्या. सर्वांनी सामाजिक कार्यात सहभागी होऊन फुले, शाहू,आंबेडकरी चळवळ बळकट करण्यास सहकार्य करावे, असे सांगितले.भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष भरत वाघमारे यांनी विवाह सोहळा म्हणजे बौद्ध समाजाची आर्थिक प्रगतीचे साधन आहे.प्रत्येक बौद्ध बांधवाने लग्नासाठी कर्ज काढून अवाढव्य खर्च करण्यापेक्षा बौद्ध सामूहिक विवाह सोहळ्यात आपल्या मुला-मुलीचे लग्न करावे असे सांगितले. प्रास्ताविक महासचिव योगेश रामटेके यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन राजेंद्र सांगोळे, संदीप मेश्राम व विद्या साखरे यांनी केले तर आभार अनिल मेश्राम यांनी मानले. यशस्वी आयोजनासाठी भरत वाघमारे, योगेश रामटेके, सोमकांत भालेकर, सुरेश बोरकर, सुनील बडोले, बी.एफ. बोरकर, राजेंद्र चंद्रिकापुरे, रविंद्र खापर्डे, राजेंद्र सांगोळे, संदीप मेश्राम, विनोद रंगारी, आनंद बन्सोड, राजेंद्र बन्सोड, धनंजय रामटेके, राजू मेश्राम, प्रा. भगवान साखरे, मिलिंद पंचभाई, पी.एम.वासनिक, अनिल डोंगरे, रविता डोंगरे, कला बागडे, पौर्णिमा साखरे, मनोज टेंभुर्णे, विनायक येडेवार, लोकेश लांडगे, रमा बोरकर, रोशन बन्सोड, देवकुमार मेश्राम, गौरव बोम्बार्डे, प्रियंका लोणारे, दिनेश डोंगरे, अनिल मेश्राम, विलास डोंगरे, रामेश्वर श्यामकुवर, एस.एस. शहारे, पिंटू रामटेके यांनी सहकार्य केले.

Web Title: Documentary activities organized for the Buddhist communal celebrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न