माहितीपट व जिंगल्स डिव्हिडीचे अनावरण

By admin | Published: July 14, 2017 01:16 AM2017-07-14T01:16:09+5:302017-07-14T01:16:09+5:30

‘सामाजिक न्यायाच्या दिशेने’ हा २९ मिनिटांच्या माहितीपट ाची डिव्हिडी तसेच महिला बचतगटांना मिनी ट्रॅक्टर योजना,...

Documentary and Jingles DVDs unveiled | माहितीपट व जिंगल्स डिव्हिडीचे अनावरण

माहितीपट व जिंगल्स डिव्हिडीचे अनावरण

Next

जिल्हा माहिती कार्यालयाची निर्मिती : पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले अनावरण
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ‘सामाजिक न्यायाच्या दिशेने’ हा २९ मिनिटांच्या माहितीपट ाची डिव्हिडी तसेच महिला बचतगटांना मिनी ट्रॅक्टर योजना, कौशल्य विकास योजना आणि आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनांवर आधारित ‘वाटचाल समतेची’ या आॅडिओ-व्हिडिओ जिंगल्सच्या डिव्हिडीचे अनावरण राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी सोमवारी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या सभेत हा कार्यक्रम पार पडला.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना व उपक्रमांची माहिती तसेच या योजनांचे यश मांडण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत या डिव्हिडी तयार केल्या आहेत.
यावेळी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, आमदार सर्वश्री गोपालदास अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, प्रभारी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, उपवनसंरक्षक एस.युवराज, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण मिहरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे प्रमुख्याने उपस्थित होते.
या माहितीपटात समता, न्याय व बंधुता या विचारांवर आधारित काम करणाऱ्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अनेक योजना, अभियान व उपक्र मांची माहिती देण्यात आली आहे. या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, गटई स्टॉल योजना, फुले-शाहू- आंबेडकर दलित वस्ती सुधार योजना, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना व इतर शिष्यवृत्ती योजना, शासकीय वसतिगृह योजना, निवासी शाळा योजना, बचतगटांसाठी मिनी ट्रॅक्टर योजना, बार्टीमार्फत स्पर्धा परीक्षेचे वर्ग, कौशल्य विकास योजना, रमाई घरकूल योजना, कृषि यांत्रिकीकरण योजना, आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना, सामुहिक विवाह योजना, थोर समाजसुधारकांचा वसा पुढे नेणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते व संस्थांना देण्यात येणारे पुरस्कार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, दिव्यांग व्यक्तीसाठी योजना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त घेण्यात आलेले विविध कार्यक्र म, व्यसनमुक्ती साहित्य संमेलन यासह अन्य योजना व कार्यक्र मांचे यश मांडणाऱ्या तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या विविध महामंडळाची माहिती या माहितीपटाद्वारे देण्यात आली आहे.
माहितीपट व जिंगल्स निर्मितीसाठी पालकमंत्री बडोले यांचे विशेष आभार मानण्यात येत असून जिल्हाधिकारी काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी ठाकरे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या माहितीपट व जिंगल्स निर्मितीमुळे जास्तीत जास्त युवक- युवतींना तसेच संबंधित घटकातील लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी खडसे यांनी सांगितले.

Web Title: Documentary and Jingles DVDs unveiled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.