उभ्या ट्रकमधून कागदपत्रे व रक्कम पळविली

By admin | Published: June 20, 2017 12:59 AM2017-06-20T00:59:11+5:302017-06-20T00:59:11+5:30

सडक-अर्जुनी तालुक्यामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून चोरीच्या बातम्यांनी खळबळ उडाली आहे.

Documents and ammunition from the vertical truck ran | उभ्या ट्रकमधून कागदपत्रे व रक्कम पळविली

उभ्या ट्रकमधून कागदपत्रे व रक्कम पळविली

Next

हातसफाई : तपासणीच्या नावावर ३० हजारांचा डल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
सौंदड : सडक-अर्जुनी तालुक्यामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून चोरीच्या बातम्यांनी खळबळ उडाली आहे. तालुक्यात चोरांच्या धुमाकुळाने नागरिक त्रस्त आहेत. परंतु चोराच्या मुसक्या आवळणारे अधिकारीच जर निष्काळजीपणाने आपली कामे करीत असतील किंवा जबाबदारीच्या नावाखाली चोरीला पुढाकार देत असतील तर नागरिक न्याय मागायला जाणार तरी कुठे, असा प्रश्न निर्माण होत आहे. उभ्या वाहनातून कागदपत्रे व पैशाची चोरी झाल्याची घटना घडली आहे.
सौंदड ते फुटाळा नॅशनल हायवे क्र.६ वरील जागेत १३ जून रोजी सकाळी ६.३० वाजता ट्रकच्या (एचआर-३८ यू-३८७९) चालकाने आपला ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला. गुरुभेजसिंह गुरजीतसिंह संधू रा. चोलासाहेब (जि. रततारण, पंजाब) असे त्या चालकाचे नाव आहे. जमदेशदपूरवरुन बॉम्बे भिवंडीला जात असताना नॅशनल हायवे क्र.६ सौंदड फुटाळा येथील मार्गाच्या कडेला ट्रक उभा करून करुन रेल्वे हाईट पोल मोजण्यासाठी गेला. त्या वेळी नॅशनल हायवेच्या कडेला ३० ते ३५ ट्रक उभे होते. मात्र ते सर्व ट्रक सोडून गुरूभेजसिंह यांच्या ट्रकमध्ये दोन आरटीओ पोलीस अधिकारी शिरले. त्यांनी छाणनीच्या नावावर ट्रकचे दार उघडून गाडीतील कागदपत्रे व बाजूला शिट खाली ठेवलेले ३० हजार रुपये लंपास केले.
यानंतर बाजूच्या वाहनधारकाला सांगितले की, या ट्रकच्या चालकाला सांगा की कागदपत्रे नेण्याकरिता गोंदिया आरटीओ आॅफिसमध्ये यावे, असे सांगितले. जेव्हा ट्रक चालक आपल्या वाहनाजवळ आले तेव्हा त्यांना बाजूच्या लोकांनी आरटीओ अधिकाऱ्यांचे बोलणे सांगितले. मात्र त्यांनी ट्रकचे दार उघडून पाहिल्यावर काही कागदपत्रे विखूरलेले होते. तसेच गाडीच्या कागदपत्रासह ३० हजार रुपये गायब झाल्याचे समजले.
त्यांनी आजूबाजूला याबाबत चौकशी केली असता गोंदिया येथील आरटीओ पोलीस अधिकारी बोलेरो गाडीने आले व तुमच्या गाडीत शिरले, अशी माहिती घटनास्थळी असलेल्या लोकांनी दिली. ही बाब कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून त्यातून लक्षात येते की उभ्या वाहनामध्ये पोलिसांनीच किंवा पोलिसांच्या वेशभूषेत असलेल्या संधीसाधूंनी हातसाफ केले आहे.
जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्या पोलिसांवर असते तेच जर चोरी करत असतील तर सर्वसामान्यांनी दाद मागावी तरी कुठे?असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय आरटीओ पोलीस अधिकाऱ्यांच्या वेशभूषेत इतर कोणी संधीसाधू किंवा बनावटी पोलीस तर नव्हते, अशीही चर्चा होत आहे.
सध्या मागील अनेक दिवसांपासून या भागात घरफोड्यांचे प्रकरण होत आहेत. ते आरोपी अजूनही मिळाले नसून हा नवीन प्रकार घडल्याने पोलीस विभागावर कोण मेहरबान आहे, असा प्रश्न जनतेमध्ये निर्माण होत आहे. आता पोलीस कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात येईल याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
सदर प्रकरणाच्या माहितीनुसार संबंधित प्रतिनिधीने माहिती मागितली असता स्थानिक आरटीओ पोलिसांनी माहिती न देता त्यांनी गोंदिया आरटीओ कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक दिला व माहिती घेण्यास सांगितले. त्या क्रमांकावर संपर्क साधल्यावर वर्दीवर लावलेले बक्कल नंबर व नाव दोन्ही अधिकाऱ्यांचे नव्हते, असे सांगण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाचे गुढ कायम आहे.

Web Title: Documents and ammunition from the vertical truck ran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.