कोरोना फक्त पँसेजर रेल्वेतूनच पसरतो का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:21 AM2021-07-18T04:21:20+5:302021-07-18T04:21:20+5:30
................. एक्सप्रेसचा प्रवास परवडत नाही गोंदिया-बल्लारशा पँसेजर गाडी सुरु होती तेव्हा ४० रुपये मोजून गोंदिया ते चंद्रपूरपर्यंत प्रवास करता ...
.................
एक्सप्रेसचा प्रवास परवडत नाही
गोंदिया-बल्लारशा पँसेजर गाडी सुरु होती तेव्हा ४० रुपये मोजून गोंदिया ते चंद्रपूरपर्यंत प्रवास करता येत होता. मात्र आता दीड वर्षांपासून ही पँसेजर बंद असल्याने याच प्रवासासाठी बसने जाण्यासाठी ३०० रुपये मोजावे लागत आहे. कोरोनामुळे आधीच रोजगार नसताना तिकीटचा हा अतिरिक्त भुर्दंड सहन करणे शक्य नाही.
- देविदास उमक प्रवासी
.....................
पँसेजर आणि लोकल गाड्यांचे तिकीट दर फारच कमी होते त्यामुळे या गाड्यांने दूरवर सुध्दा प्रवास करणे गोरगरीबांना शक्य होते.
बसचे प्रवासभाडे तिप्पट असून कुटुंबासह बसने जाणे म्हणजे दीड ते दोन हजार रुपयांचा खर्च येत आहे. कोरोनाच्या संकट काळात या गाड्या बंद असल्याने प्रवाशांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
...............
मग पँसेजरच बंद का
हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया हे प्रमुख रेल्वे स्थानक आहे. लॉकडाऊनपूर्वी या रेल्वे स्थानकावरुन नियमित दीडशे गाड्या धावत होत्या. आता लोकल आणि पँसेजर गाड्या वगळता ४५ गाड्या दररोज धावत आहे. यात विशेष गाड्यांची संख्या अधिक आहे. रेल्वे विभागाला लोकल आणि पँसेजर गाड्या सुरु केल्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती वाटत आहे. शिवाय प्रवासी कोरोनाच्या नियमांचे पालन करणार की नाही म्हणून पँसेजर गाड्या सुरु करण्यास रेल्वे विभाग विलंब करीत असल्याची माहिती आहे.
.......
कोरोनाचा संसर्ग जरी आटोक्यात असला तरी लोकल आणि पँसेजर गाड्या सुरु करण्यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडून अद्याप कुठलेही निर्देश प्राप्त झालेले नाही. त्यामुळे या गाड्या निश्चित केव्हापासून सुरु होतील हे आत्ताच सांगता येणार नाही.
- ए.के.राय, जनसंपर्क अधिकारी रेल्वे.
..............
सध्या सुरु असलेल्या स्पेशल ट्रेन
गोंदिया ते नागपूर
कोरोबा-अमृतसर
जबलपूर-चांदाफोर्ट
छत्तीसगड एक्सप्रेस
समता एक्सप्रेस
अजमेर-पुरी
गया-चेन्नई
..................
सध्या सुरु असलेल्या एक्सप्रेस गाड्या
नागपूर-बिलासपूर इंटरसिटी एक्सप्रेस
गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस
गोंदिया-मुंबई विदर्भ एक्सप्रेस
हावडा-अहमदाबाद
छत्तीसगड-अमृतसर
पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस
...................