रेल्वेने दुसऱ्या राज्यामध्ये जाताय काय? आधी कोरोनाची टेस्ट करुन घ्या...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:36 AM2021-07-07T04:36:17+5:302021-07-07T04:36:17+5:30
........... पँसेजर गाड्या केव्हा सुरु होणार - कोेरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षांपासून लोकल आणि पँसेजर गाड्या बंद आहेत. त्यामुळे ...
...........
पँसेजर गाड्या केव्हा सुरु होणार
- कोेरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षांपासून लोकल आणि पँसेजर गाड्या बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
- पँसेजर आणि लोकल गाड्या सुरु केल्यास रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी वाढून कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे पँसेजर आणि लोकल गाड्या सुरु करण्यास विलंब केला जात आहे.
- ७५ टक्के लसीकरण झाल्यानंतरच लोकल आणि पँसेजर गाड्या सुरु करण्यासंदर्भात रेल्वे विभाग विचार करीत असल्याची माहिती आहे.
...........
हावडा मार्गावरील गाड्यांमध्ये आरक्षण मिळेना
- मागील दहा पंधरापासून हावडाकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये गर्दी वाढली आहे. त्यामुळे या गाड्यांमध्ये आरक्षण मिळणे कठीण झाले आहे.
- हावडा-मुंबई, पुणे-हावडा, हावडा मेल या गाड्यांमध्ये शंभर ते दीडशेवर वेटींग आहे.
- तर मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांमधील गर्दी कमी झाली असून या गाड्यांमध्ये सहज आरक्षण मिळत आहे.
..................
कोट
कोरोनाचा संसर्ग आता बऱ्याच प्रमाणात आटोक्यात असूृन सध्या स्थितीत ४० वर एक्सप्रेस गाड्या सुरु आहे. लसीकरणाची गती वाढल्यानंतर काही प्रमाणात रेल्वे गाड्या सुरु होण्याची शक्यता आहे. लोकल आणि पँसेजर गाड्या सुरु करण्यासंदर्भात अद्यापही कुठलाही निर्णय झाला नाही.
- ए.के.राय, जनसंपर्क अधिकारी.
............
कोरोना लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक
महाराष्ट्रातून आसाम, पश्चिम बंगाल, मिझोराम, मध्यप्रदेश या राज्यात जाणाऱ्या प्रवाशांना कोरोना टेस्ट केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे दुसऱ्या राज्यात जाताना आधी कोरोना टेस्ट करुन घेण्याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे या राज्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी कोरोना चाचणी केल्याचे प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक आहे.
.............