लसीकरणापूर्वी रक्तदान करा, अन्यथा होणार रक्ताचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 05:00 AM2021-03-14T05:00:00+5:302021-03-14T05:00:02+5:30

रक्ताची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे, तर रक्त संकलनाचे प्रमाण अत्यल्प असून, करे तरी रक्तदान शिबिर घेऊन रक्त संकलन केले जाते. त्यात मगील वर्षांपासून कोरोनामुळे शिबिरांचे आयोजन मंदावले आहे. त्यात आता कोरोनाची लस घेणाऱ्या व्यक्तीला त्यानंतर २८ दिवस रक्तदान करता येत नाही. अशात येथील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण होणार. करिता रक्तदात्यांनी रक्तदान करून त्यांनतर लस घ्यावी, असे रक्तपेढीतून कळविले जात आहे. 

Donate blood before vaccination, otherwise there will be a shortage of blood | लसीकरणापूर्वी रक्तदान करा, अन्यथा होणार रक्ताचा तुटवडा

लसीकरणापूर्वी रक्तदान करा, अन्यथा होणार रक्ताचा तुटवडा

Next
ठळक मुद्देरक्तपेढीत होतोय तुटवडा : दररोज ३० ते ३५ युनिट रक्ताची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील एकमेव शासकीय रक्तसंकलन पेढीतून दररोज ३० ते ३५ रुग्णांना रक्ताचा पुरवठा करण्यात येतो. सिकलसेल, थैलीसीमीया, रक्तक्षय असलेल्या रुग्णांना रक्ताचा पुरवठा करणे गरजेचे असून, रक्ताची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे, तर रक्त संकलनाचे प्रमाण अत्यल्प असून, करे तरी रक्तदान शिबिर घेऊन रक्त संकलन केले जाते. त्यात मगील वर्षांपासून कोरोनामुळे शिबिरांचे आयोजन मंदावले आहे. त्यात आता कोरोनाची लस घेणाऱ्या व्यक्तीला त्यानंतर २८ दिवस रक्तदान करता येत नाही. अशात येथील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण होणार. करिता रक्तदात्यांनी रक्तदान करून त्यांनतर लस घ्यावी, असे रक्तपेढीतून कळविले जात आहे. 
आधीच रक्तदाते कमी असून, त्यात मागील वर्षीपासून कोरोनाच्या भीतीमुळे रक्तदानासाठी नागरिक पुढे येत नसल्याचे दिसत आहे. अवघ्या राज्यातच रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. 
अशात येथील एकमेव शासकीय रक्तपेढीतही कित्येकदा रक्ताचा तुटवडा जाणवला होता. अशात काही सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांकडून रक्तदान शिबिरांचे आयोजन करून येथील रक्तपेढीची गरज भागविण्यात आली. अशात कसे तरी वर्ष निघून गेले. मात्र आता कोरोना लस आली असून, मोठ्या प्रमाणात नागरिक लस लावून घेत आहेत. यामध्ये युवकांचे प्रमाणही अधिक असून, रक्तदान करणारे हे युवकच आहेत. 
मात्र एनबीटीसीच्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोनाची लस घेणारी व्यक्ती त्यानंतर २८ दिवस रक्तदान करू शकणार नाही. म्हणजेच हजारोंच्या संख्येत लस घेणारे युवक रक्तदान करू शकणार नाही. असे झाल्यास रक्तपेढीला रक्ताचा पुरवठा बंद पडणार व ही बाब गंभीर आहे. येथील बाईं गंगाबाई रूग्णालयातील शासकीय रक्तपेढीतूनच जिल्ह्यासह लगतच्या राज्यांतील गरजूंनाही रक्ताचा पुरवठा केला जातो. 
मात्र रक्तपेढीलाच रक्तदाते न मिळाल्यास याचे गंभीर परिणाम पडणार. करिता लसीकरणापूर्वी युवकांनी रक्तदान करावे, असे रक्तपेढीकडून कळविण्यात आले आहे. 

युवकांनी पुढाकार घेणे गरजेचे 
रक्तदात्यांमध्ये जिल्ह्यात ४५ ते ५० वर्ष वयोगटातील खूप लोक आहेत. ते आता लस घेत असल्याने त्यांना पुढचे २८ दिवस रक्तदान करता येणार नाही. अशात त्यांनी आपली सामाजिक जबाबदारी समजून लस घेण्यापूर्वी  रक्तदान करणे गरजेचे आहे. लस घेण्याच्या तयारीत असलेल्या लोकांनी आधी रक्तदान करावे असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे. 
शासकीय रक्तपेढीत मोजकाच साठा 
येथील शासकीय रक्तपेढीत दररोज ३० ते ३५ युनिट रक्ताची मागणी असते. शनिवारी येथील बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयातील रक्तसंकलन केंद्रात १३९ युनिट रक्त शिल्लक होते. यामध्ये ए-पॉझिटिव्ह ३०, ए-निगेटिव्ह १, बी-पॉझिटिव्ह ४०, बी-निगेटिव्ह १, ओ-पॉझिटिव्ह ५५, ओ-निगेटिव्ह ०, एबी-पॉझिटिव्ह ११, एबी-निगेटिव्ह रक्त गटाची १ युनिट उपलब्ध होती. 

मागील वर्षापासून रक्तदानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कोरोनामुळे रक्तदान नाहीच्याच बरोबर होत आहे. परंतु रक्ताचा तुटवडा पाहून करण्यात आलेल्या आवाहनामुळे सामाजिक जाणीव असलेल्या तरुणांनी पुढे येऊन रक्तदान केले. त्यामुळे रक्ताची मागणी असणाऱ्या रुग्णांचा जीव वाचविता आला. आता कोरोनाचे लसीकरण होत आहे. या लसीकरणासाठी कोरोनाची प्रतिबंधित लस घेणाऱ्यांना २ महिन्यांपर्यंत रक्तदान करता येणार नाही. अशात त्यांनी लसीकरण करण्यापूर्वीच रक्तदान करावे.
 -डॉ. सुवर्णा हुबेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी गोंदिया

 

Web Title: Donate blood before vaccination, otherwise there will be a shortage of blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.