डोंगरगाववासीय पीत आहेत गढूळ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:51 AM2018-03-10T00:51:06+5:302018-03-10T00:51:06+5:30

तिरोडा तालुक्यातील डोंगरगाव-खडकी येथील पाणी पुरवठा योजना मागील महिनाभरापासून खंडीत विद्युत पुरवठ्यामुळे बंद आहे. त्यामुळे गावकऱ्यांना दूरवरुन पाणी आणून तहान भागवावी लागत आहे.

Dongaragaravadana pits are inefficient water | डोंगरगाववासीय पीत आहेत गढूळ पाणी

डोंगरगाववासीय पीत आहेत गढूळ पाणी

Next
ठळक मुद्देपाणी पुरवठा योजना बंद : गावकºयांचे आरोग्य धोक्यात

हितेंद्र जांभुळकर ।
ऑनलाईन लोकमत
सुकडी/डाकराम : तिरोडा तालुक्यातील डोंगरगाव-खडकी येथील पाणी पुरवठा योजना मागील महिनाभरापासून खंडीत विद्युत पुरवठ्यामुळे बंद आहे. त्यामुळे गावकऱ्यांना दूरवरुन पाणी आणून तहान भागवावी लागत आहे. मात्र बोअरवेलला गढूळ पाणी येत असल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार डोंगरगाव-खडकी या गावाला महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाच्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठा केला जातो. गावकºयांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे यासाठी १ कोटी २५ लाख रुपये खर्चून पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. त्यामुळे गावकºयांना सुध्दा शुध्द पाणी पिण्यास मिळेल अशी अपेक्षा होती. डोंगरगाव-खडकी येथील पाणी पुरवठा योजना ही तिरोडा तालुक्यातील सर्वात मोठी पाणी पुरवठा योजना आहे.पण या योजनेला मागील वर्षभरापासून ग्रहण लागले आहे. त्यामुळे ही योजना कधी बंद तर कधी सुरू असते. पाच वर्षांपूर्वी डोंगरगाव आणि खडकी हे दोन्ही गावे एकत्र असल्यामुळे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने वाढीव पाणी पुरवठा योजनेत या दोन्ही गावांचा समावेश केला. याच योजनेतंर्गत गावकºयांना पाणी पुरवठा सुरू होता. मात्र मागील महिनाभरापासून थकीत वीज देयकामुळे पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यामुळे या योजनेव्दारा पाणी पुरवठा बंद असल्याने गावकºयांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. जिल्ह्यात मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने विहिरी व बोअरवेलनी सुध्दा तळ गाठला आहे.
गावातील महिला पाण्यासाठी १ ते २ कि.मी.भटकंती करुन पाणी आणत आहेत. मात्र ते पाणी देखील गढूळ असल्याने गावकºयांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र आहे. त्यामुळे गावातील नवजात मुले, स्तनदा माता, गरोदर माता, लहान मुले यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पाणी टंचाई उपाय योजना कागदावर
मार्च महिन्याला सुरूवात झाली असली तरी जिल्हा प्रशासनातर्फे अद्यापही पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना करण्यात आल्या नाही. जिल्ह्यातील शेकडो बोअरवेल नादुरुस्त आहेत. तर अनेक बोअरवेलेच पाईप खराब झाले असून ते बदलण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे कुठलीच पाऊले उचलण्यात आली नाही. एकंदरीत पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना केवळ कागदावर असल्याचे चित्र आहे.
गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
डोंगरगाव-खडकी येथील बंद असलेली पाणी पुरवठा योजना त्वरीत सुरु करा. तसेच गावातील बंद असलेल्या बोअरवेलची दुरूस्ती करण्यात यावी. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील गावकºयांनी दिला आहे.
अहवालाकडे दुर्लक्ष
जिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पात देखील अल्प पाणीसाठा आहे. परिणामी जिल्ह्यातील भूजल पातळीत घट झाली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईची स्थिती गंभीर राहणार असल्याची शक्यता वर्तविली होती. तसा अहवाल देखील प्रशासनाला दिला. त्यामध्ये तिरोडा तालुक्याला पाणी टंचाईची सर्वाधिक झळ बसण्याचा अंदाज वर्तविला होता. तसा अहवाल सुध्दा जिल्हा प्रशासनाकडे सोपविला होता. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

Web Title: Dongaragaravadana pits are inefficient water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.