अनाथांच्या मदतीला धावून आले दानदाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 11:50 PM2019-08-10T23:50:58+5:302019-08-10T23:52:35+5:30

जन्मदात्या मायबापाचे छत्र हिरावून गेल्याने अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बाक्टी, निमगाव, बोंडगावदेवी, सोमलपूर विहिरगाव येथील त्या निरागस मुलांवर अनाथ होण्याची दुर्देवी पाळी आली. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून लोकमतने त्या अनाथ मुलांच्या सातत्याने संपर्कात राहून त्यांच्या दैनंदिन जिवनाचे वास्तव चित्र समाजासमोर मांडले.

Donors came in to help the orphans | अनाथांच्या मदतीला धावून आले दानदाते

अनाथांच्या मदतीला धावून आले दानदाते

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । लोकमतचा पुढाकार, पहाडीदार कुपार लिंगो संस्थेचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : जन्मदात्या मायबापाचे छत्र हिरावून गेल्याने अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बाक्टी, निमगाव, बोंडगावदेवी, सोमलपूर विहिरगाव येथील त्या निरागस मुलांवर अनाथ होण्याची दुर्देवी पाळी आली. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून लोकमतने त्या अनाथ मुलांच्या सातत्याने संपर्कात राहून त्यांच्या दैनंदिन जिवनाचे वास्तव चित्र समाजासमोर मांडले. त्यानंतर त्यांच्या मदतीसाठी अनेक दानदाते धावून आले.
गोंदियाच्या सामाजिक कार्यकर्त्या पहांदीपारी कुपार लिंगो बहुउद्देशिय संस्थेच्या अध्यक्ष प्रा.डॉ.सविता बेदरकर अनाथांच्या सर्वातोपरी मदतीसाठी धावून येतात.त्यांनी केलेल्या मदतीमुळे व इतर दानशूर व्यक्तींच्या मदतीने परिसरातील अनाथ मुलांना अन्यधान्य, जिवनोपयोगी वस्तु तसेच शालेय साहित्याचे वाटप कौटुंबीक कार्यक्रमात करण्यात आले. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व लोकमतचे प्रतिनिधी अमरचंद ठवरे यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक दानदाते कृष्णा खंडाईत, साधू मेश्राम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव संतोष टेंभुर्णे, विजय ईरले अनिरुद्ध रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते.परिसरातील अनाथ मुलांना समाजातील दानदात्यांकडून आर्थिक पाठबळ मिळावे. त्यांच्या दैनंदिन जीवनात जन्मदात्या मायाबापाची उणिव भासता कामा नये. खेळण्या-बाळगण्याच्या वयात आई-वडिलांचे छत्र हिरावून बसलेल्या निरागस मुलांच्या चेहऱ्यावर हास्याची,आनंदाची झळाळी राहावी.अनाथ मुलांच्या शैक्षणिक कार्यात खंड पडू नये, यासाठी अनाथ मुलांच्या घरी जाऊन प्रत्यक्षात त्यांच्या हलाखीच्या परिस्थितचे वास्तव चित्र लोकमतच्या माध्यामातून मांडले. त्यानंतर अनाथ मुलांच्या घरी जाऊन त्यांना मदतीचा हात दिला.स्थानिक सामाजिक कार्यकर्ते कृष्णा खंडाईत, समाजशील शिक्षक विजय ईरले यांनी जिवनोपयोगी वस्तु व शालेय साहित्याची मदत केली.
परिसरातील स्नेहा दिनेश मेश्राम, गुजं जागेश्वर राऊत, विरान दिनेश मेश्राम, मोहिनी अनिल सूर्यवंशी, स्वाती सुर्यवंशील रोशन कांबळे,आशिष कांबळे,ज्योत्सना सूर्यवंशी, व्टिंकल सूर्यवंशी, कुणाली घनश्याम ठाकरे, उमेश विजय गोंधळे, अमित गोंधळे, आदिंनी अनाथ मुलांना तांदूळ, तेलाचे टीन, तुवरडाळ,साबन,साखर तसेच शालेय साहित्याचे वाटप केले.

परमार्थ साधण्यातच खरा आनंद
स्वता:साठी प्रत्येक माणूस जगतो.कष्ठ, सहन करतो परंतु इतरांच्या सुखासाठी आत्मीयतेची कष्ठ उपसून मदतीसाठी धावून जाणे हीच खरी मानव सेवा आहे. गरजू, वंचित अनाथ मुलांना मदत करणे हे पुण्याचे काम आहे.या उपक्रमात सहभागी अनाथांना मदत करण्याचा आनंद वेगळा आहे. इतरांच्या दुखात सहभागी होणे हिच खरी माणूसकी असल्याचे त्यांनी सांगितले.

अनाथांना मदत हे पुण्याचे काम
मायबापाचे छत्र हिरावलेल्या अनाथ मुलांना उभे आयुष्य जगताना विविध समस्यांना पुढे जावे लागते. समाजात वावरतांना सामाजिक बांधिलकी जपून अनाथांना मदत करण्यासाठी समाजबांधवांनी पुढे यावे. अनाथांना मदत करणे हे पुण्याचे काम असल्याचे कृष्णा खंडाईत म्हणाले.
अनाथांना आधार द्या
लहान वयात मायबापाची सावली निघून गेली. त्यांच्यावर मानसिक आघात होतो. अशा निरागस मुलांना सांभाळणे, मदत करणे समाजाचे काम आहे. समाजाचे काही देणे लागते ही भावना ठेवून प्रत्येकांनी त्यांच्या दुखाच्या वेळी सहभागी होवून सामाजिक दायित्व म्हणून अनाथांना पालकाचा आधार देऊन मदत करा असे विजय ईरले यांनी सांगितले.

Web Title: Donors came in to help the orphans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.