शेतकरी नवरा नको गं बाई !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 05:00 AM2021-03-21T05:00:00+5:302021-03-21T05:00:19+5:30
पोट भरण्यासाठी शेतीला व्यवसाय म्हणून करणाऱ्या शेतकरी पोराला कुणीच विचारत नसल्याची खंत तरूण शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळाली. डॉक्टर, नोकरपेशा यांना मोठ्या प्रमाणात पसंती आहे. त्यातही डॉक्टर एमबीबीएस असायला हवा असाच समज समाजात दृढ झाला आहे. व्यावसायिकाला ना पसंती ना नकार दिला जातो. परंतु शेतकरी मुलाला सरळ नकारच दिला जात आहे. त्यामुळे अनेक मुलांचे लग्न होत नाही. मुलींचा जन्मदर घटल्याने मुलांना मुली मिळणे कठिण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सुखी संसाराच्या स्वप्नांना आता ग्रहण लागत आहे. मुलींकडील मंडळींची अपेक्षा मुलाकडून मोठ्या प्रमाणात असल्याने चांगल्या-चांगल्या मुलांना मुली मिळणे कठिण झाले आहे. शिकून मोठे झालेल्या मुलांच्या हातात नोकरी नसल्याने ते लग्न करू शकत नाही. नोकरी नाही तर छोकरी नाही अशी स्थीती गोंदिया जिल्ह्यात आहे. शेतकरी मुलाला मुलींची नापसंती आहे.
पोट भरण्यासाठी शेतीला व्यवसाय म्हणून करणाऱ्या शेतकरी पोराला कुणीच विचारत नसल्याची खंत तरूण शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळाली. डॉक्टर, नोकरपेशा यांना मोठ्या प्रमाणात पसंती आहे. त्यातही डॉक्टर एमबीबीएस असायला हवा असाच समज समाजात दृढ झाला आहे. व्यावसायिकाला ना पसंती ना नकार दिला जातो. परंतु शेतकरी मुलाला सरळ नकारच दिला जात आहे. त्यामुळे अनेक मुलांचे लग्न होत नाही. मुलींचा जन्मदर घटल्याने मुलांना मुली मिळणे कठिण झाले आहे.
मुलींकडून ठेवल्या जातात अट
लग्नानंतरी नवऱ्याने सोबत ठेवायला हवे, नवरा शहराच्या ठिकाणी असावा, आईवडीलांपासून दूर असावा. नोकरीच्या ठिकाणी नवऱ्या मुलीला न्यावे, शिकण्याची इच्छा असेल तर शिकू द्यावे, नोकरी करण्याची इच्छा मुलीची झाली तर नोकरी करू देण्यास मुलगा तयार असावा अश्या विविध अटी मुलांकडे मुलींकडील मंडळी ठेवत आहेत.
सर्वाधिक मागणी एमबीबीएस डॉक्टरांना
मुलगा लग्नासाठी पाहात असताना मुलगा डॉक्टर असावा पण त्यातही तो एमबीबीएस डॉक्टर असावा अशी मुलीकडील मंडळींची अपेक्षा असते.
मुलगा नोकरीवर असावा, व्यसनी नसावा, शहाराच्या ठिकाणी वास्तव्यास असल्यास अधिक पसंती दर्शविली जाते. नोकरीसाठी बाहेर असलेल्या मुलासाठी वशीला लावला जातो. माझी मुलगी नोकरीदार मुलासोबतच सुखी राहू शकते ही आईवडीलांची धारणा झाली आहे.
छोटे कुटुंब असलेल्या मुलांनाही पसंती दिली जाते. संयुक्त कुटुंबातील नोकरीवर असलेल्या कुटुंबातील मुलांनाही मुली नाकारत आहेत.