इंग्रजी भाषेत माहिती भरण्याची सक्ती नकोच ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:32 AM2021-08-27T04:32:02+5:302021-08-27T04:32:02+5:30
आमगाव : तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी बुधवारी (दि. २६) एकात्मिक बाल विकास कार्यालयाने दिलेले मोबाइल परत करीत आंदोलन करीत शासनाच्या ...
आमगाव : तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी बुधवारी (दि. २६) एकात्मिक बाल विकास कार्यालयाने दिलेले मोबाइल परत करीत आंदोलन करीत शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला.
एकात्मिक बालविकास विभागामार्फत अंगणवाड्या चालविल्या जात असून अंगणवाड्यांची तसेच विद्यार्थ्यांची योग्य माहिती शासनाला पुरविण्यात यावी, यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाइल देण्यात आले होते. या मोबाइलमध्ये चालणारे स्पॉफ्टवेअर हे इंग्रजी भाषेत असल्याने बऱ्याच अंगणवाडी सेविकांना ते भरणेदेखील जमत नाही. मोबाइलची रॅमदेखील कमी असल्याने हा मोबाइल व्यवस्थित चालत नसून माहिती भरायला अडचण होत आहे. उशिरा माहिती अंगणवाडी सेविका देत असल्याने अंगणवाडी सेविकांचे पगारदेखील कपात केले जात आहे. आधीच अल्प वेतनात काम करीत परवडत नसल्याने शासनाने हे मराठी किंवा हिंदी भाषेत चालणारे सॉफ्टवेअर टाकून व रॅम वाढवून नवीन मोबाइल द्यावे, अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे. यावेळी सर्व अंगणवाडी सेविकांनी स्वत:जवळील जुने मोबाइल एकात्मिक बाल विकास कार्यालयाकडे परत केले. बाल प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. अंगणवाडी संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिता कठाणे, सचिव गीता बहेकार, उपाध्यक्ष इंदू बोपचे, कोषाध्यक्ष जनाबाई चुटे, शकुंतला हरिणखेडे, कृष्णा गिरेपुंजे, मोहिता ब्राह्मणकर, किरण बनसोड, पंचशीला पटले, निर्मला ठाकरे, सुशिला भेलावे तसेच तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.