कोरोना लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:30 AM2021-05-20T04:30:46+5:302021-05-20T04:30:46+5:30
केशोरी : या परिसरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संसर्गाचा कहर केला होता. सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याचे ...
केशोरी : या परिसरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संसर्गाचा कहर केला होता. सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. मात्र यानंतरही कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार केल्यास कोरोनावर निश्चितच मात करणे शक्य आहे. त्याकरिता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या, असा सल्ला डॉ. पिंकू मंडल यांनी दिला आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी येथे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधित मोठ्या प्रमाणात आढळून आले होते. अनेक रुग्णांचा सीटी स्कोअर दहापेक्षा जास्त आला होता. ऑक्सिजन लेव्हलसुद्धा खालावली होती. यातून रुग्णांना सावरण्यात यश आले असले तरीही अजूनही कोरोना आजाराकडे कोणत्याही नागरिकांनी दुर्लक्ष न करता योग्य वेळी कोविडचे निदान केल्यास कमी यावर मात करणे शक्य आहे. कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांनी इतरांपेक्षा वेगळे राहून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनास मदत करावी. पहिल्या तीन दिवसांत कोरोना रुग्णांनी दुर्लक्ष करू नये. तोंडावर मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत. कोणत्याही नागरिकाने कोरोना आजाराकडे दुर्लक्ष करू नये, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. पिंकू मंडल यांनी कळविले आहे.