शेतकऱ्यांनो दिशाभूल करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:37 AM2021-06-09T04:37:17+5:302021-06-09T04:37:17+5:30
गोरेगाव : खरीप हंगामातील बोनस मिळण्यास विलंब होत असल्याने भाजपचे नेते महाविकास आघाडी सरकारवर टिका करुन शेतकऱ्यांची दिशाभूल करीत ...
गोरेगाव : खरीप हंगामातील बोनस मिळण्यास विलंब होत असल्याने भाजपचे नेते महाविकास आघाडी सरकारवर टिका करुन शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. मात्र शेतकऱ्यांनी याकडे लक्ष देऊ नये, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या बोनसचा लाभ निश्चितपणे दिला जाईल. याबाबत कुठली शंका नाही. आम्ही कुठल्या संकटात शेतकऱ्यांबरोबर सक्षमपणे उभे राहू अशी ग्वाही खा. प्रफुल्ल पटेल यांनी येथे आयोजित कार्यक्रमात दिली.
खा. प्रफुल्ल पटेल हे मागील दोन दिवसांपासून गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी सोमवारी गोरेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, माजी आ. राजेंद्र जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, योगेंद्र भगत,रूपसेन बघेले, प्रदीप जैन, प्रकाश रहांगडाले, महेंद्र चौधरी, रामोजी हरिणखेडे, महिला तालुका अध्यक्ष कल्पना बहेकार, उषा रामटेके, अर्चना चौधरी, कल्पना शेवटे, सुषमा आगळे, अनिता तुरकर, दशरथ बिसेन, गिरधारी कटरे, संजय रहांगडाले, प्रवीण टेंभुर्णीकर, विनोद रहांगडाले, बाप्पू बिसेन, आनंद बडोले, खुशाल वैद्य, गेंदलाल गौतम, बाबा बहेकार, राजू येरणे, बाबा बोपचे, कुवरलाल जांभुळकर, लालचंद चव्हाण, टेकेश रहांगडाले, सोमेश्वर बघेले, अशोक बेघेले, बळीराम राऊत, श्याम बोपचे, सुरेंद्र रहांगडाले, धनेश्वर तिरेले उपस्थित होते. खा. प्रफुल्ल पटेल म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोना संक्रमण काळात सुध्दा चांगले काम केले. कोरोनामुळे राज्य आर्थिक संकटात असताना सुध्दा धानाला बोनस जाहीर करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांच्या विकासासाठी आपण सदैव कटिबध्द असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.